२५ धावा आणि विराट कोहली कपिल-सचिनसारख्या दिग्गजांच्या यादीत !

दिल्ली । दिल्ली कसोटीत विराट कोहलीने जर २५ धावा केल्या तर कसोटीत ५००० धावा करणारा तो ११वा भारतीय खेळाडू बनेल. भारतीय संघ २०१७मध्ये शेवटचा कसोटी सामना २ डिसेंबरपासून श्रीलंका संघाविरुद्ध दिल्ली येथे खेळणार आहे.

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये ६२ सामन्यात १०४ डावात ५१.८२च्या सरासरीने ४९७५ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या १९ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये जगात तब्बल ९३ फलंदाजांनी ५ हजार धावा केल्या आहेत. त्यात १० भारतीय खेळाडू आहेत.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी कमीतकमी २ हजार धावा केल्या आहेत त्यात विराट कोहली हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अर्धशतकांपेक्षा जास्त शतके केली आहेत.

भारताकडून कसोटीत ५हजार धावा करणारे खेळाडू
15921 सचिन तेंडुलकर
13265 राहुल द्रविड
10122 सुनील गावसकर
8781 व्हीव्हीएस लक्ष्मण
8503 वीरेंद्र सेहवाग
7212 सौरव गांगुली
6868 दिलीप वेंगसकर
6215 मोहम्मद अझरुद्दीन
6080 गुंडाप्पा विश्वनाथ
5248 कपिल देव