आजपर्यंतचे महाराष्ट्रीयन हिंद केसरी…!!

हिंद केसरी ही भारतातील प्रतिष्ठेची आणि ऐतिहासिक कुस्ती स्पर्धा आहे. १९५९ साली प्रथमच हिंद केसरी स्पर्धा झाली. देशपातळीवरील ह्या स्पर्धेचा पहिला विजेता हा महाराष्ट्रीयन होता. श्रीपती खंचनाळे यांनी त्या वेळी हिंद केसरीची पहिली मानाची गदा पटकावली होती. त्यानंतर आजपर्यंत एकट्या महाराष्ट्राने ४९ हिंद केसरी पैकी तब्बल ८ दिले आहेत. या वर्षीची हिंद केसरी स्पर्धा दुसऱ्यांदा पुणे शहरात होत आहे ज्या शहराने आजपर्यंत दोन हिंद केसरी देशाला दिले आहेत. २००५ साली योगेश दोडके तर २०१३ साली अमोल बराटे ह्या पुण्याच्या वारज्यातील पहिलवानांनी ही स्पर्धा जिंकली होती.

हेच ते मल्ल, ज्यांनी महाराष्ट्राची मान अभिमानाने देशात उंचावली…!!!

४ महाराष्ट्रीयन पहिलवान नशीब आजमावणार 

ह्या वर्षी ४ महाराष्ट्रीयन पहिलवान या स्पर्धेत उतरत आहेत.त्यात ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी उपविजेता पै.अभिजित कटके, पै.माऊली जमदाडे, पै.किरण भगत, पै.सागर बिराजदार यांचा समावेश आहे.

दुखापतीमुळे ट्रिपल महाराष्ट्र केसरी नाही खेळणार 

महाराष्ट्राला ज्या पहिलवानाकडून मोठ्या अपेक्षा आहेत तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही.