जेम्स अँडरसनने मोडला कोर्टनी वॉल्शचा विक्रम, आता ग्लेन मॅकग्राच्या विक्रमाच्या बरोबरीकडे वाटचाल

मेलबॉर्न । ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडच्या जेम्स अँडरसनने कोर्टनी वॉल्श यांच्या कसोटी क्रिकेटमधील ५१९ विकेट्सचा विक्रम मोडला आहे. त्याने आज दुसऱ्या दिवशी दोन विकेट्स घेत कसोटीत ५२१विकेट्सचा टप्पा गाठला.

त्याने १३३ कसोटी सामन्यात २७.३८च्या सरासरीने २४८ डावात ही कामगिरी केली आहे.

कोर्टनी वॉल्श यांनी विंडीजकडून खेळताना १३२ सामन्यात २४.४४च्या सरासरीने ५१९ विकेट्स घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजमध्ये ज्यांनी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत त्यात अँडरसनच्या पुढे आता केवळ ग्लेन मॅकग्रा आहे. त्याने १२४ सामन्यात ५६३ विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता जेम्स अँडरसन ५व्या स्थानावर पोहचला आहे. पहिल्या ५ खेळाडूंमध्ये आता ३ फिरकी आणि २ वेगवान गोलंदाज आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
८००- मुथय्या मुरलीधरन (सामने- १३३)
७०८-शेण वॉर्न (सामने- १४५)
६१९- अनिल कुंबळे (सामने- १३२)
५६३- ग्लेन मॅकग्रा (सामने- १२४)
५२१- जेम्स अँडरसन (सामने- १३३)