डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 

पुणे | पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे सनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन देण्यात आले आहे.

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होत आहे. यांत दीपेश अभ्यंकर, शौनक शिंदे, पृथा वर्टिकर, अनिहा डिसूझा, नील मुळ्ये, देवयानी कुलकर्णी, स्वरूप भादलकर, नभा किरकोळेलाही प्रथम मानांकन देण्यात
आले आहे. या स्पर्धेत तेरा गटांत मिळून एकूण 537 प्रवेशिका आल्या आहेत.

या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 80हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, सर्वोत्कृष्ट खेळाडूला करंडक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतून म्हाळुंगे, बालेवाडी येथे 9 ते 16 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 49 व्या आंतरजिल्हा व 80 व्या राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे.

या प्रमुख स्पर्धेबरोबरच 25 व 26 ऑगस्ट रोजी डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक प्रौढ गटाची राज्य मानांकन स्पर्धाही होत आहे. ही स्पर्धा 40, 50, 60, 65, 70 ,75 वर्षावरील पुरुष आणि 40, 50 व 60 वर्षावरील महिला गटात, तसेच सांघिक स्पर्धाही होत आहेत. अशी माहिती पीवायसी क्‍लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे व गिरीश करंबेळकर यांनी दिली. या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून मधुकर लोणारे हे काम पाहणार आहेत.  विद्या मुळ्ये, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये गिरीश करंबेळकर, अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये,दीपक हळदणकर, दीपेश अभ्यंकर, कपिल खरे यांचा समावेश आहे.

गटवार मानांकन असे :

पुरुष गट : सनत बोकील, वैभव दहिभाते, शौनक, शिंदे, ऋषभ सावंत, सुयोग पाटील, अजय कोठावळे, रजत कदम, दीपेश अभ्यंकर. महिला ः ईशा जोशी, सलोनी शहा, श्रुती गबाणे, फौजिआ मेहेराल्ली. प्रौढ गट ः दीपेश अभ्यंकर, शेखर काळे, नितीन मेहेंदळे, पराग पार्शीनकर.

एकवीस वर्षाखालील मुले : सनत बोकील, शौनक शिंदे, श्रीयश भोसले, आरुष गलपल्ली, करण कुकरेजा, रजत कदम, आदर्श गोपाळ, अद्वैत ब्रह्मे; मुली : ईशा जोशी, मृण्मयी रायखेलकर, पृथा वर्टिकर, सलोनी शहा, अंकिता पटवर्धन, स्वप्नाली नराळे, सिद्धी आचरेकर, उज्वला गायकवाड;

अठरा वर्षाखालील मुले : शौनक शिंदे, आरुष गलपल्ली, करण कुकरेजा, श्रीयश भोसले, आदर्श गोपाळ, अनय कोव्हेलमुडी, मिहीर डंके, अर्चन आपटे. मुली ः पृथा वर्टिकर, स्वप्नाली नराळे, मृण्मयी
रायखेलकर, प्रीती गाढवे, अनिहा डिसूझा, अंकिता पटवर्धन, पूजा जोरवर, श्रुती गबाणे.

पंधरा वर्षाखालील मुले : अर्चन आपटे, नील मुळ्ये, अनय कोव्हेलमुडी, आदी फ्रॅंक अगरवाल, आदित्य जोरी, अर्णव भालवणकर, भार्गव चक्रदेव, आदित्यवर्धन त्रिमल. मुली : अनिहा डिसूझा, पृथा वर्टिकर, मृण्मयी रायखेलकर, मयूरी ठोंबरे, राधिका सकपाळ, देवयानी कुलकर्णी, धनश्री पवार, आनंदिता लुणावत;

बारा वर्षाखालील मुले : नील मुळ्ये, वेदांग जोशी, अद्वैत ढवळे, कुमार कुलकर्णी, नंदिश पटेल, दक्ष जाधव, नंदन पटेल, निशांत गद्रे. मुली : देवयानी कुलकर्णी, आनंदिता लुणावत, राधिका सकपाळ, साक्षी पवार, नभा किरकोळे, रिया पाठक, जान्हवी फणसे, आकांक्षा मार्कंडे.

दहा वर्षाखालील मुले : स्वरूप भादलकर, अभिराज सकपाळ, आदित्य सामंत, रामानुज जाधव, क्षितिज जोशी, वीर डोणगावकर, आराध्य पाटील, ईशान खांडेकर. मुली : नभा किरकोळे, रुचीता दारवटकर, तनया अभ्यंकर, नैशा रावस्कर.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स

आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती