सचिनच्या ‘नर्व्हस ९०’च्या नात्यानंतर आता विराटही या यादीत

कोलकाता । विराट कोहली आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ९२ धावांवर बाद झाला. याबरोबर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या नकोश्या विक्रमच्या यादीतही आला आहे.

भारताकडून वनडेत ९० ते ९९ धावांमध्ये सर्वाधिक वेळा बाद किंवा नाबाद राहण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तब्बल १७ वेळा ‘नर्व्हस ९०’ मध्ये बाद झाला आहे. तर एका सामन्यात नाबाद राहिला आहे.

विराट कोहलीही या यादीत सामील झाला असून विराटही वनडेमध्ये५वेळा ९०च्या घरात बाद झाला असून एकदा नाबाद राहिला आहे. यापूर्वी सचिन(१८), मोहम्मद अझरुद्दीन(७), वीरेंद्र सेहवाग(६), गांगुली(६), धोनी(६) आणि विराटही(६) हे फलंदाज ९० ते ९९ मध्ये बाद झाले आहेत किंवा नाबाद राहिले आहेत.

विराट कोहली यापूर्वी ९१, ९४, ९९, ९१आणि ९२ धावांवर बाद झाला आहे तर ९६ धावांवर नाबाद राहिला आहे.