पाचवी कसोटी: तिसरा दिवस फलंदाजांनी गाजवला; भारताकडून जडेजा, विहारीचे अर्धशतक

लंडन। द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 2 बाद 114 धावा केल्या आहेत आणि 154 धावांची आघाडी घेतली आहे.

तसेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (9सप्टेंबर) भारताकडून अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीने अर्धशतक केले आहे. तर इंग्लंडकडून शेवटचा सामना खेळणारा अॅलिस्टर कूक अर्धशतकापासून 4 धावा दूर आहे.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर जो रुट आणि अॅलिस्टर कूक अनुक्रमे 29 आणि 46 धावांवर नाबाद खेळत आहेत.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली होती. त्यांचा सलामीवीर फलंदाज केटन जेनिंग्ज लवकर बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 10 धावांवर असताना त्रिफळाचीत केले.

पण त्यानंतर पुन्हा कूक आणि मोईन अलीची जोडी जमली होती. त्यातच अलीचा 14 धावांवर असताना दुसऱ्या स्लीपला उभ्या असणाऱ्या केएल राहुलने झेल सोडला. त्यामुळे अलीला जीवदान मिळाले.

परंतू या जीवदानाचा त्याला जडेजाने जास्त फायदा घेऊ दिला नाही. चेंडू बदलल्यानंतर लगेचच जडेजाने अलीला 20 धावांवर असताना त्रिफळाचीत केले.

त्यानंतर मात्र रुट आणि कूक खेळपट्टीवर टिकून राहिले आहेत. या दोघांनीही तिसऱ्या दिवसाखेर तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 52 धावांची भागीदारी रचली आहे.

तत्पुर्वी भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावातील 6 बाद 174 धावांपासून खेळायला सुरुवात केली. यावेळी जडेजा 8 आणि विहारी 25 धावांवर नाबाद खेळत होते. त्यांनी तिसऱ्या दिवशीही चांगली सुरुवात केली.

त्यांनी पहिल्या सत्रात जवळ जवळ इंग्लंडला विकेट घेण्यापासून रोखले होते. परंतू पहिले सत्र संपायला काही वेळ असतानाच विहारी 56 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला.

या दोघांनी सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली. पण मोईन अलीने विहारीला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर जडेजाने फलंदाजीची जबाबदारी घेतली. त्याने तळातल्या फलंदाजांच्या साथीने भारताला 292 धावांचा टप्पा गाठून दिला.

जडेजाने या डावात 11 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 156 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. त्याला इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने अनुक्रमे 4 आणि 1 धावा करत साथ दिली.

त्याआधी भारताकडून पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या दिवशी 49 धावांची खेळी केली होती.

इंग्लंडकडून या डावात जेम्स अँडरसन(2/54), स्टुअर्ट ब्रॉड(1/50), बेन स्टोक्स(2/56), मोईन अली(2/50), आदिल रशीद(1/19) आणि सॅम करनने(1/49) विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक:

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 332 धावा

भारत पहिला डाव – सर्वबाद 292 धावा

इंग्लंड पहिला डाव – 2 बाद 114 धावा

(अॅलिस्टर कूक 46 धावा आणि जो रुट 29 धावांवर नाबाद खेळत आहे.)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पदार्पणातच अर्धशतक करणारा हनुमा विहारी द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील

दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने शेवटच्या सामन्यासाठी केला भुयारी रेल्वेने प्रवास

युएस ओपन: नोवाक जोकोविच आणि डेल पोट्रो यांच्यात रंगणार अंतिम सामना