टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’

क्रिकेट जगतात सर्वाधिक विक्रम होता. हा असा खेळ आहे जिथे प्रत्येक चेंडूनंतर काहीतरी विक्रम होतो. त्यातही हा खेळ जर ५ दिवसांच्या अर्थात कसोटी प्रकारातील असेल तर विक्रमांची अक्षरशः रांग असते.

असाच क्रिकेटच्या या प्रकारात एक असा विक्रम खास विक्रम आहे ज्यातील नावे वाचून आपण अवाक व्हाल. क्रिकेटमध्ये असे ५ कसोटीपटू आहेत ज्यांनी कसोटीमध्ये शतकांपेक्षा जास्त ० धावांवर बाद झाले.

#१ इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज माइक गॅटिंगने ७९ कसोटी सामन्यात १० शतके केली तर १६वेळा तो ‘०’ धावांवर बाद झाला.

#२ इंग्लंडचाच दुसरा दिग्गज कसोटीपटू माइक अथरटन याचीही काही वेगळी अवस्था नाही. त्याने तब्बल १९९ कसोटी सामने खेळले. त्यात तो १६ वेळा शतकी खेळी करू शकला तर २० वेळा ‘०’ धावांवर बाद झाला.

#३ श्रीलंकेचा माजी कर्णधार मरावान आटापटूने ९० कसोटी सामन्यात १६ शतके केली आणि २२ वेळा तो ० धावेवर बाद झाला.

#४ त्याच देशाच्या सनाथ जयसूर्याचीही काही वेगळी परिस्थिती नाही. त्याने ११० कसोटी सामने खेळताना १४ शतके केली तर १५वेळा ० धावेवर बाद झाला.

#५ या यादीतील एक खास नाव म्हणजे न्युझीलँडचा माजी कर्णधार ब्रेंडॉन मॅकलम. त्याने १०१ कसोटी सामन्यात १२ शतके केली तर १४ वेळा तो ० धावसंख्येवर बाद झाला.

या यादीत एकमेव भारतीय फलदांज:
या यादीत भारताचे एकमेव खेळाडू आहेत. ते म्हणजे मोहिंदर अमरनाथ. त्यांनी ६९ कसोटीत ११ शतके करणारे अमरनाथ १२ वेळा ० धावेवर बाद झाले.