6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत अॅमडॉक्स संघाचा दुसरा विजय

पुणे । स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत अॅमडॉक्स संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. गालाघर, नेटसर्फ, बार्कलेज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत जुबीन गौतमच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर अॅमडॉक्स संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना बीएमसी सॉफ्टवेअर संघाने 9 षटकात 6 बाद 58 धावा केल्या.

58 धावांचे लक्ष उज्वल श्रीवास्तवच्या 27 धावांसह अॅमडॉक्स संघाने 8.1 षटकात 3 बाद 60 धावा करून पुर्ण करत विजय मिळवला. जुबीन गौतम सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत शुबेंधू पांडेच्या 37 धावांच्या बळावर गालाघर संघाने सिनेक्रॉन संघाचा 8 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना गालाघर संघाने 9 षटाकात 7 बाद 50 धावा केल्या. यात श्रीकांत सोमवंशीने 17 धावा करून शुबेंधूला सुरेख साथ दिली.

50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोशन कदमच्या अचूक गोलंदाजीपुढे सिनेक्रॉन संघ 9 षटकात 7 बाद 42 धावांत गारद झाला. शुबेंधू पांडे सामनावीर ठरला.

अन्य लढतीत अमोद गोगाटेच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर नेटसर्फ संघाने अर्न्स्ट अँड यंग संघाचा 6 गडी राखून दणदणीत पराभव केला. तर भास्कर श्रीवास्तवच्या नाबाद 28 धावांच्या बळावर बार्कलेज संघाने सेलपॉईंट टेक्नॉलॉजी संघाचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
बीएमसी सॉफ्टवेअर- 9 षटकात 6 बाद 58 धावा(किरण कुडलिंगकर 36, दिपेश अरेकर नाबाद 22, चिन्मय दुबे 13, जुबीन गौतम 3-20) पराभूत वि अॅमडॉक्स – 8.1 षटकात 3 बाद 60 धावा(सुमित देसवाल नाबाद 12, उज्वल श्रीवास्तव 27, सत्येंद्र यादव नाबाद 16, श्रीपाल चोपडा 2-13) सामनावीर- जुबीन गौतम
अॅमडॉक्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.

गालाघर – 9 षटाकात 7 बाद 50 धावा(श्रीकांत सोमवंशी 17, शुबेंधू पांडे 37, रोशन कदम 10, विवेक राठोड 5-20) वि.वि सिनेक्रॉन- 9 षटकात 7 बाद 42 धावा(परशूराम पाटील 30, संदिप वाघ 12, रोशन कदम 3-10) सामनावीर- शुबेंधू पांडे
गालाघर संघाने 8 धावांनी सामना जिंकला.

अर्न्स्ट अँड यंग – 9 षटकात 6 बाद 46 धावा(हसन अली 17, चिन्मय जोशी 27, सिध्दार्थ कुलकर्णी 14, अमोद गोगाटे 2-22) पराभूत वि नेटसर्फ- 7.2 षटकात 2 बाद 64 धावा(अमोद गोगाटे नाबाद 47) सामनावीर- अमोद गोगाटे
नेटसर्फ संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.

सेलपॉईंट टेक्नॉलॉजी- 9 षटकात 4 बाद 69 धावा(प्रेशीत बागडे 42, वेद पाठक 26, कौशिक पैंड्या नाबाद 10, नितेश सिंग 2-33) पराभूत वि बार्कलेज- 8.6 षटकात 3 बाद 70 धावा(प्रमोद पेंडसे 14, भास्कर श्रीवास्तव नाबाद 28, संदिप कानिटकर 23, रितेश ढोरे 2-23) सामनावीर- भास्कर श्रीवास्तव
बार्कलेज संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.