६५वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आजपासून कराडमध्ये

सातारा | सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने लॅबर्टी मजदूर मंडळ, कराड जि. सातारा आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची ६५ वी पुरुष / महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१७ आजपासून सुरु होणार आहे.

या स्पर्धेचे उदघाटन माश्री अजितदादा पवार व मा.आ.बाळासाहेब पाटील याच्या हस्ते होणार आहे.

राज्य अजिंक्यपद स्पर्धा १ ते ४ डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, कराड जि. सातारा येथे खेळवली जाणार असून स्पर्धेत एकूण पुरुष विभागाचे २५ संघ आणि महिला विभागाचे २० संघ सहभागी झाले आहेत.

प्रत्येक विभागाचे सहा गटात विभाजन गेले असून साखळी व नंतर बादफेरीत सामने खेळवले जातील. यास्पर्धेत जिल्हाच्या संघांमध्ये नवोदित खेळाडू बरोबरच महाराष्ट्रातील प्रो कबड्डी खेळणारे नामांकित खेळाडूंचाही सहभाग असणार आहे.

निलेश शिंदे, निलेश साळुंखे, गिरीश इरणाक, रिषांक देवाडीका, महेंद्र राजपूत, उमेश म्हात्रे, विशाल माने, काशीलिंग आडके, मयुर शिवतरकर आणि ओमकार जाधव असे नामांकित खेळाडू यास्पर्धेत खेळणार आहेत