राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच-सिन्नर यांच्या सहकार्याने दि.३१ऑक्टोबर ते ४नोव्हेंबर २०१८ या कालावधीत “६६व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत २५पुरुषाचे,तर २२महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. या सहभागी पुरुष व महिला संघाची ६-६ गटात विभागणी करण्यात आली आहे. या गटातील संघाचे पहिले तीन दिवस साखळी सामने खेळविण्यात येतील.

या प्रत्येक गटातून २ संघ असे दोन्ही विभागातून १२-१२ संघ बाद फेरीत दाखल होतील. शेवटचे दोन दिवस बाद फेरीचे सामने खेळविले जातील. गतवर्षी केलेल्या कामगिरीवरून प्रत्येक संघाला या स्पर्धेत नामांकन देण्यांत येते. त्यानुसार स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात येते. राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी आज या होणाऱ्या स्पर्धेची गटवारी प्रसार माध्यमांकरिता जाहीर केली.

पुरुषांच्या अ गटात गटविजेत्या पुण्याला तसे आव्हानच नाही. ब गटात मात्र उपविजेत्या कोल्हापूरला धुळे तसेच पालघर आव्हान उभे करू शकते. क गटात ठाण्याला रायगड, परभणी कडवे आव्हान देऊ शकतात. ड गटात तसे सांगलीला बाद फेरी गाठण्यात कमी त्रास होईल. इ गटात मात्र यजमान नाशिकने सागर बांदेकर सारख्या अनुभवी प्रशिक्षकांकडे आपला संघ सोपवून या गटात चुरस निर्माण केली आहे.

त्यांना या गटात मुंबई उपनगर, रत्नागिरी सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी लढत द्यावी लागणार आहे. फ गटात मुंबईला नंदुरबार, सोलापूर कडवी लढत देऊ शकतात. महिलांच्या अ व ब गटात तीन-तीन संघ असल्यामुळे चुरस तशी कमीच दिसते.

क गटात कोल्हापूरला तसे आव्हानच दिसत नाही. इ गटात मुंबई शहराला यजमान नाशिक बरोबरच बीड देखील कडवी लढत देऊ शकतात. महिलांच्या सामन्यांचा अंदाज वर्तविणे जोखमीचे ठरेल. प्रत्यक्ष मैदानावर ज्या दिवशी जो संघ चांगला खेळ करेल तो त्या दिवशी बाजी मारेल.

स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे
पुरुष विभाग:-
अ गट :- १)पुणे, २)जालना, ३)बीड, ४)हिंगोली.
ब गट :- १)कोल्हापूर, २)धुळे, ३)पालघर, ४)लातूर.
क गट :- १)ठाणे, २)रायगड, ३)परभणी, ४)सातारा.
ड गट :- १)सांगली, २)अहमदनगर, ३)जळगाव, ४)सिंधुदुर्ग.
इ गट :- १)मुंबई उपनगर, २)रत्नागिरी, ३)औरंगाबाद, ४)नाशिक.
फ गट :- १)नंदुरबार, २)मुंबई शहर, ३)सोलापूर, ४)उस्मानाबाद, ५)नांदेड.

महिला विभाग :-
अ गट :- १)मुंबई उपनगर, २)अहमदनगर, ३)सोलापूर.
ब गट :- १)पुणे, २)सातारा, ३)उस्मानाबाद.
क गट :- १)कोल्हापूर, २)रायगड, ३)औरंगाबाद, ४)जळगाव.
ड गट :- १)रत्नागिरी, २)सांगली, ३)सिंधुदुर्ग, ४)धुळे.
इ गट :- १)मुंबई शहर, २)नाशिक, ३)बीड, ४)परभणी.
फ गट :- १)ठाणे, २)पालघर, ३)जालना, ४)लातूर.