६६ व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी जोरात सुरू

सिन्नर येथे आडवा फाटा मैदानावर दिनांक ३१ ऑक्टोबर ते ४नोव्हेंबर दरम्यान ६६ व्या वरिष्ठ गट पुरूष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे.

स्पर्धेसाठी उभारण्यात येणाऱ्या क्रीडांनागरीची तयारी सुरू झाली आहे. ३७० रानींग फुट प्रेक्षक गॅलरी, ३१२ रानींग फूट विशेष अतिथी साठीची प्रेक्षक गॅलरी , १६८० चौरस फुटाचे मुख्य स्टेजची उभारणी सुरू आहे. त्याच प्रमाणे स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या सहा कबड्डी मैदानांची जय्यत तयारी सुरू केली आहे.

खेळाडूंची निवासव्यवस्था खास सदनिकांनमध्ये करण्यात अली आहे. भोजन व्यवस्था गोदावरी लॉन्स येथे करण्यात आली आहे. सदर स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने,नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यने व सह्याद्री युवा मंच सिन्नर च्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जिल्हा परिषद नाशिक हे आहेत . स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख तशा सह्याद्री युवा मंच सिन्नरचे अध्यक्ष उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शरद कातकाडे,बाळू घुगे,किरण मोठे,विजुभाऊ गीते,अमोल भामरे, शिवराम सांगळे आदी प्रयत्नशील आहेत.