६६वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा यावर्षी कोकणातील रोह्यात?

पुणे | ६६वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान यावेळी महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. अजून या स्पर्धेचे ठिकाण नक्की झाले नाही. तरीही ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील रोह्यात होऊ शकते.

६५वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ३१ डिसेंबर २०१७ ते ६ जानेवारी २०१८ या काळात गाचीबोवली इनडोअर स्टेडियम, हैद्राबाद येथे झाली होती. यात महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने विजेतेपद मिळवले होते.

यावेळी महिला आणि पुरुषांची स्पर्धा वेगळी होणार आहे. पुरुषांच्या यजमान पदाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. याच्या तारखा अजूनही ठरल्या नाहीत. तर महिलांची ६६वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१८ दरम्यान होणे अपेक्षित होते.

यापुर्वी पुरुषांची स्पर्धा बारामतीला किंवा पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात घेण्याचा विचार होता. परंतु महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवारांनी ही स्पर्धा रोह्याला घेण्याचा संघटना विचार करत असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा

प्रो कबड्डीचा पोस्टर बाॅय राहुल चौधरीसाठी आजचा दिवस खास, सुवर्णक्षरांनी लिहीले जाणार नाव

१८ वर्षीय नवीन कुमारचा प्रो कबड्डीत विक्रमांचा विक्रम

सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ