६६वी पुरुष गटाची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यात, जाणून घ्या काय आहेत तारखा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अखेर तारखा ठरल्या, ज्या राष्ट्रीय स्पर्धेची कबड्डी रसिक आतुरतेने वाट बघत होते त्या स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाकडून राष्ट्रीय स्पर्धाचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

यंदा वरिष्ठ गट पुरुषांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन या स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्ह्यात रोहा या ठिकाणी करणार आहे. २८ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होईल.

६५ वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ३१ डिसेंबर २०१७ ते ६ जानेवारी २०१८ या काळात गाचीबोवली इनडोअर स्टेडियम, हैद्राबाद येथे झाली होती. यात महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने विजेतेपद मिळवले होते.

वरिष्ठ गटाच्या पुरुष व महिला राष्ट्रीय स्पर्धा यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार असून, महिलांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ३ ते ६ जानेवारी दरम्यान कुरनुल, आंध्रप्रदेश येथे होणार आहे.

किशोर-किशोरी गटाची राष्ट्रीय स्पर्धा २१ ते २४ जानेवारी २०१९ दरम्यान बिहार, पाटणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तर कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा १५ ते १८ फेब्रुवारी २०१९ ला पश्चिम बंगाल मध्ये होणार आहेत.

– राष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रम:

३० वी किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: बिहार कबड्डी असोसिएशन
ठिकाण: पटना
कालावधी: २१ ते २४ जानेवारी २०१९

४५ वी कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: पश्चिम बंगाल (AKFI Unit)
ठिकाण: कोलकत्ता
कालावधी: १५ ते १८ फेब्रुवारी २०१९

६६ वी वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: आंध्र कबड्डी असोसिएशन
ठिकाण: कुरनुल
कालावधी: ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१९

६६ वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१८
आयोजक: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
ठिकाण: रायगड जिल्हा
कालावधी: २८ ते ३१ जानेवारी २०१९

महत्त्वाच्या बातम्या:

काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना

असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय

विराट कोहली आणि अॅडलेड…हे नातं काही खास!