सहाव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात पीवायसी क संघाला विजेतेपद

पुणे, दि.2 एप्रिल 2017- पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे आयोजित सहाव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात पीवायसी क संघाने नवसह्याद्री डायनामाईट्स संघाचा  २४-०८ असा पराभव करून विजेतेपद  संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात १००अधिक गटात पीवायसीच्या प्रशांत सुतार व हिमांशू गोसावी यांनी नवसह्याद्री डायनामाईट्सच्या आदित्य जोशी व अनिल एस  यांचा  ६-१ असा तर, खुल्या गटात पीवायसीच्या अनुप मिंडा व अमित लाटे या जोडीने नवसह्याद्री डायनामाईट्सच्या गजानन कुलकर्णी व अभिषेक बटवेरा यांचा  ६-३ असा पराभव करून  आघाडी घेतली. ९०अधिक गटात पीवायसीच्या सुंदर अय्यर आणि योगेश पंतसचिव यांनी उमेश भिडे व आशिष डिके यांचा ६-१ असा तर, खुल्या गटात  पीवायसीच्या विजय खुराडेने हिमांशू गोसावीच्या साथीत नवसह्याद्री डायनामाईट्सच्या रोहन राजापूरकर व आदित्य जोशी या जोडीचा ६-३ असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी क संघाने  एमडब्लूटीएचा  २३-१३ असा तर, नवसह्याद्री डायनामाईट्स संघाने  डेक्कन ड संघाचा २२-१७ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: पीवायसी क वि.वि.एमडब्लूटीए २३-१३(१००अधिक गट: हिमांशू गोसावी/प्रशांत सुतार वि.वि.प्रवीण पांचाळ/एम कृष्णा ६-०; खुला गट: अनुप मिंडा/अमित लाटे वि.वि. सुमंत पॉल/आशिष मनियार ६-३; ९०अधिक गट: सुंदर अय्यर/योगेश पंतसचिव वि.वि.प्रदीप बेपारी/राजेश मंकणी ६-४; खुला गट: प्रशांत सुतार/विजय खुराडे पराभूत वि.मंदार वाकणकर/निलेश ओस्तवाल ५-६(४-७));

नवसह्याद्री डायनामाईट्स वि.वि.डेक्कन ड २२-१७(१००अधिक गट: अनिल एस/आदित्य जोशी वि.वि.विक्रम उमराणी/पद्माकर कर्वे ६-५(७-५); खुला गट: रोहन राजापूरकर/आदित्य जोशी वि.वि. अमित पाटणकर/केदार पाठक ६-५(७-२); ९०अधिक गट: उमेश भिडे/आशिष डिके वि.वि.जितेंद्र जोशी/श्रीकांत कुलकर्णी ६-१; खुला गट: अभिषेक बटवेरा/गजानन कुलकर्णी पराभूत वि.सारंग पाबळकर/विक्रम उमराणी ४-६);

अंतिम फेरी: पीवायसी क वि.वि.नवसह्याद्री डायनामाईट्स २४-०८(१०० अधिक गट: प्रशांत सुतार/हिमांशू गोसावी वि.वि.आदित्य जोशी/अनिल एस अनिल एस ६-१; खुला गट: अनुप मिंडा/अमित लाटे वि.वि.गजानन कुलकर्णी/अभिषेक बटवेरा ६-३; ९०अधिक गट: सुंदर अय्यर/योगेश पंतसचिव वि.वि.उमेश भिडे/आशिष डिके ६-१; खुला गट: विजय खुराडे/हिमांशू गोसावी वि.वि.रोहन राजापूरकर/आदित्य जोशी ६-३).