6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस अमलराज ऍन्थोनी, सनिल शंकर शेट्टी, सुधांशू ग्रोवर, मनिका बात्रा, पुजा सहस्त्रबुध्दे, मधुरीका पाटकर यांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

अचंता शरथ कमलचा मानांकीत खेळाडूवर विजय

पुणे | सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत  पुरूष गटात बिगर मानांकीत पीएसपीबीच्या अचंता शरथ कमलने तिस-या मानांकीत एएआयच्या अर्जुन घोषचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. अमलराज ऍन्थोनी, सनिल शंकर शेट्टी, सुधांशू ग्रोवर, मनिका बात्रा, पुजा सहस्त्रबुध्दे, मधुरीका पाटकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूष गटात उप उपांत्यपुर्व फेरीत पीएसपीबीच्या बिगर मानांकीत अचंता शरथ कमलने एएआयच्या तिस-या मानांकीत अर्जुन घोषचा 4-2(9/11,5/11,11/7,11/6,11/5,11/6) असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत पीएसपीबीच्या अमलराज ऍन्थोनी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत हरियाणाच्या सौरव साहाचा 4-2(11/6,11/2,9/11,9/11,11/7,11/9) असा तर
 
पीएसपीबीच्या दुस-या मानांकीत सुधांशू ग्रोवरने हरियाणाच्या जीत चंद्राचा 4-2(11/4,11/6,13/11,5/11,9/11,11/5) असा पराभव केला. चौथ्या मानांकीत पीएसपीबीच्या सनिल शंकर शेट्टीने दिल्लीच्या पार्थ विरमणीचा 4-3(13/11,3/11,3/11,5/11,11/8,11/8,11/8) असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
 
महिला गटात मानांकीत खेळाडूंनी आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. एकतर्फी झालेल्या लढतीत दुस-या मानांकीत पीएसपीबीच्या मनिका बात्राने एएआयच्या मल्लिका भांडारकरचा 4-0(11/9,12/10,12/10,12/10) असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तिस-या मानांकीत पीएसपीबीच्या पुजा सहस्त्रबुध्देने पश्चिम बंगालच्या सुरभी पटवारीचा 4-1(11/9,9/11,11/9,13/11,11/6) असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. चौथ्या मानांकीत पाएसपीबीच्या मधुरीका पाटकरने आरबीआयच्या श्रीजा अकुलाचा 4-1(11/9,9/11,11/7,11/9,18/16) असा तर पाचव्या आरएसपीबीच्या मानांकीत सागरीका मुखर्जीने पश्चिम बंगालच्या पोमंती बस्याचा 4-2(11/7,12/10,10/12,4/11,11/7,11/9) असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरात प्रवेश केला
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप उपांत्यपुर्व फेरी: पुरुष गट:
अचंता शरत कमल(पीएसपीबी) वि.वि अर्जुन घोष(3)(एएआय) 4-2(9/11,5/11,11/7,11/6,11/5,11/6)
अमलराज ऍन्थोनी(1)(पीएसपीबी) वि.वि सौरव साहा(हरीयाणा) 4-2(11/6,11/2,9/11,9/11,11/7,11/9)
विवेक भार्गव(राजस्थान) वि.वि जुबीन कुमार(हरीयाणा) 4-2(6/11,11/5,11/6,8/11,11/5,12/10)      
सुभाष मनी(आयए ऑड एडी) वि.वि श्रेयल तेलंग(कर्नाटक) 4-0(11/9,23/21,11/6,11/7)
सनिल शंकर शेट्टी(4)(पीएसपीबी) वि.वि पार्थ विरमणी(दिल्ली) 4-3(13/11,3/11,3/11,5/11,11/8,11/8,11/8)          
बिर्डी बोरो(आसाम) वि.वि रेगन अलबुकर(महाराष्ट्र ब) 4-2(13/11,8/11,11/8,11/7,8/11,12/10)
सुधांशू ग्रोवर(2)(पीएसपीबी) वि.वि जित चंद्रा(हरीयाणा)4-2(11/4,11/6,13/11,5/11,9/11,11/5)
अनिर्बन घोष(आरएसपीबी) वि.वि सुष्मीत श्रीराम(एएआय) 4-1(9/11,11/3,13/11,11/4,11/1)
 
उप उपांत्यपुर्व फेरी: महिला गट:
मनिका बात्रा(2)(पीएसपीबी) वि.वि मल्लिका भांडारकर(एएआय) 4-0(11/9,12/10,12/10,12/10)    
पुजा सहस्त्रबुध्दे(3) (पीएसपीबी) वि.वि सुरभी पटवारी(पश्चिम बंगाल) 4-1(11/9,9/11,11/9,13/11,11/6) 
मधुरीका पाटकर(4) (पाएसपीबी) वि.वि श्रीजा अकुला(आरबीआय) 4-1(11/9,9/11,11/7,11/9,18/16)
सागरीका मुखर्जी(5)(आरएसपीबी) वि.वि पोमंती बस्या(पश्चिम बंगाल) 4-2(11/7,12/10,10/12,4/11,11/7,11/9)
सुदिप्ती सेल्वाकुमार(एएआय) वि.वि प्रियदर्शनी दास(आरबीआय) 4-1(11/2,4/11,16/14,12/10,13/11)       
दिव्या देशपांडे(पीएसपीबी) वि.वि क्रित्वीका सिन्हा रॉय(पश्चिम बंगाल) 4-1(11/5,11/8,11/7,6/11,11/9)    
रिथ रिश्या(पीएसपीबी) वि.वि सेनहोरा डिसुझा(देना बॅक) 4-2(5/11,11/8,11/8,9/11,12/10,11/5)   
अहीका मुखर्जी(आरबीआय) वि.वि अनंदीता चक्रबोर्ती(आरएसपीबी) 4-0(11/5,11/7,11/3,11/9)