शाहरुख खानने घेतला आणखी एक टी२० संघ विकत

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने दक्षिण आफ्रिकेने सुरु केलेली टी२० ग्लोबल लीगमधला एक संघ विकत घेतला आहे. जेपी डुमिनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केपटाउन संघाची मालकी शाहरुख खानकडे असणार आहे.

या लीगची घोषणा आज लंडनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. यात क्रिकेट आफ्रिकेने ८ नवीन संघाना संधी द्यायचं ठरवलं असून दक्षिण आफ्रिकेतील ११ शहरात ही स्पर्धा होणार आहे. डर्बन शहराला पहिला सामना आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ग्ग्रॅमी स्मिथ, अँड्राइव हॉल, अॅलन डोनाल्ड, हर्षल गिब्ज, पॉल अॅडम्स, अशवेल्ल प्रिन्स, अँड्राइव हडसन आणि पॉल हॅरिस हे वेगवेगळ्या संघांचे अम्बॅसॅडर म्हणून काम करतील.

हाशिम अमला (डर्बन संघ), क्विंटन डीकॉक (बेनोनी संघ), फाफ डुप्लेसी (स्टिललें बोच ), जेपी डुमिनी (केप टाउन ), डेविड मिल्लर (ब्लोएम्फॉन्टेईं), रबाडा (जोहान्सबर्ग), इम्रान ताहीर (पोर्ट एलिझाबेथ ) आणि एबी डिव्हिलिअर्स (बेनोनी संघ) संघाचं नेतृत्व करणार आहे.

दिल्ली डेरडेव्हिल्सच्या हेमंत दुवा यांनी जोहान्सबर्गचा संघ विकत घेतला आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानने यापूर्वी आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स तर कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाईट रायडर्स हे संघ विकत घेतले आहे.