विराट सेना करतेय ३८ वर्ष जुन्या विक्रमाचा पाठलाग

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.

भारताचा हा द्विपक्षीय मालिकेतील सलग ९वा विजय होता. यापूर्वी केवळ विंडीज संघाने १९८० ते १९८८ या काळात सलग १४ द्विपक्षीय वनडे मालिका जिंकल्या होत्या.

भारताचा ९ द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्याचा प्रवास जून २०१६मध्ये सुरु झाला. तेव्हा भारताने झिम्बाब्वेला ३-० असे पराभूत केले होते.

भारताने जे सलग ९ द्विपक्षिय मालिका विजय मिळवले आहेत ते असे-

झिम्बाब्वे विरुद्ध झिम्बाब्वेमध्ये ३-० (कर्णधार एमएस धोनी)
न्यूझीलँड विरुद्ध भारतात ३-२ (कर्णधार एमएस धोनी)
इंग्लंड विरुद्ध भारतात २-१
विंडीज विरुद्ध विंडीजमध्ये ३-१
श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत ५-०
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात ४-१
न्यूझीलँड विरुद्ध भारतात २-१
श्रीलंकेविरुद्ध भारतात २-१
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत ४-१ (एक सामना बाकी )