एक विकेट घेण्यासाठी ९ खेळाडू राहिले स्लिप’मध्ये उभे

सध्या सुरु असलेल्या रणजी स्पर्धेत छत्तीसगड विरुद्ध पश्चिम बंगाल सामन्यात एक अजब गोष्ट बघायला मिळाली. बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीने सामन्यांच्या अंतिम दिवशी भारताचे गोलंदाज मोहम्मद शमी आणि अशोक दिंडा गोलंदाजी करत असताना ९ स्लिपचे क्षेत्ररक्षण लावले.

या आधी झिम्बाब्वेविरुद्ध गोलंदाजी करताना ऑस्ट्रलियाच्या ग्लेन मॅकग्राथने असे केले होते.

याबद्दल बोलताना बंगाल संघाचा कर्णधार असलेला मनोज तिवारी म्हणाला की आम्हाला काहीही करून शेवटचा बळी लवकर घ्यायचा होता. त्याचबरॊबर अतिरिक्त धावाही द्यायच्या नव्हत्या त्यामुळे आम्ही असे क्षेत्ररक्षण लावले.

बंगालने या सामन्यात एक डाव आणि १६० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शमी आणि दिंडा दोघांकडूनही उत्तम गोलंदाजी झाली. या दोघांनी मिळून एकूण १८ बळी घेतले. बंगालने पहिल्या डावात ७ बाद ५२९ धावांवर डाव घोषित केला.

त्याला प्रतिउत्तर छत्तीसगडच्या फलंदाजांना देताच आले नाही त्यांचा पहिला डाव ११० धावातच गुंडाळण्यात बंगालला यश आले या डावात दिंडाने ७ बळी घेतले. बंगालने छत्तीसगडला फॉलोऑन दिला. परंतु दुसऱ्या डावातही अभिमन्यू चौहान आणि दोन्हीही डावात अर्धशतके झळकावणारा आशुतोष सिंग सोडला तर छत्तीसगडच्या फलंदाजांनी खास काही केले नाही.

अभिमन्यू चौहानने शतकी खेळी करताना ११५ धावा केल्या. तर आशुतोष सिंगने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे ५३ आणि ७१ धावा केल्या.शमीने त्यांचा दुसरा डाव ६ बळी घेत २५९ धावात गुंडाळला.

सामान्यांच्या चौथ्या दिवशी जेव्हा छत्तीगडचे फलंदाज मैदानावर आले तेव्हा ते ५ बाद २२९ धावांवर खेळत होते. परंतु पुढचे ५ बळी त्यांनी ३० धावात गमावले.

बंगालला जिंकण्यासाठी जेव्हा एका बळीची गरज होती तेव्हा मनोज तिवारीने शमी आणि दिंडा गोलंदाजी करताना ९ क्षेत्ररक्षक स्लिपला ठेवले.

या क्षेत्ररक्षणाचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यावर त्यावर क्रिकेट रसिकांच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्या. त्यात दिंडाने ४७ धावात १० बळी घेतल्याने त्याच्यावर अनेक विनोदही झाले.

त्याचबरोबर शमीने घेतलेल्या १०५ धावात ८ बळीनमुळे त्याने निवड समितीनेही लक्ष वेधून घेतले आहे की त्याचा फॉर्म सध्या चांगला आहे.

बंगालकडून फलंदाजीत २ शतके तर ३ अर्धशतके झळकावली गेली. कौशिक घोष ने ११४ धावा तर सुंदीप चॅटर्जी ने ११८ धावा केल्या. त्याच बरोबर अभिषेक रमण ९४ (धावा), अनुष्टुप मुजुमदार ७० (धावा) आणि बोड्डूपाली अमित (५० धावा) यांनी अर्धशतके झळकावली