का होतेय सध्या रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची तुलना

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचा आज(4 जानेवारी) दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांचा घोषित केला आहे.

आज भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक केले आहे. त्याने 2018 ला कसोटी क्रिकेट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर त्याचा हा केवळ 9 वा कसोटी सामना आहे. या 9 सामन्यांपैकी 4 सामन्यात त्याने 90 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

पण या सामन्यात मोठी धावा करण्यात अपयश आलेला अजिंक्य रहाणे मागील काही सामन्यांपासून धावा करण्यासाठी झगडत आहे. त्याला मागील दोन वर्षात फक्त तीन सामन्यातच 90 पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. त्याने 01 जानेवारी 2017 पासून आत्तापर्यंत एकूण 24 सामने खेळले आहे.

यामध्ये रहाणेच्या फक्त एक शतकाचा समावेश आहे. हे शतकही त्याने ऑगस्ट 2017 मध्ये केले आहे. तर पंतने 2 शतके केली आहेत.

पंतने या सामन्यात 189 चेंडूत नाबाद 159 धावा केल्या आहेत. यात खेळीत त्याने 15 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जे ना जमले कुणाला, ते जमले रिषभ पंतला

कोणालाही आवडणार नाही असा विक्रम करणारा पुजारा ठरला आठवा भारतीय

दिडशतकी खेळीनंतरही असा नकोसा विक्रम करणारा चेतेश्वर पुजारा दुसरा भारतीय