सेहवागला भेटायला आला 93 वर्षांचा अनोखा चाहता

अनेक क्रिकेटचे चाहते वेगनेगळे प्रयत्न करत खेळाडूंना भेटायला येत असतात . असाच एक 93 वर्षांचा चाहता किंग्ज इलाव्हन पंजाब विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज दरम्यानच्या सामन्यानंतर पंजाबचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवागला भेटायला आला होता. 

या चाहत्याचे नाव ओम प्रकाश असून या बद्दल स्वत: सेहवागने ट्विट करत माहीती दिली आहे. त्याने  ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” ओम प्रकाश जींना भेटुन खूप भावनिक वाटले. ते 93 वर्षांचे असून माझ्याबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी मला चंदीगढमध्ये पटीयालाहून भेटायला आले आहेत.”

याचबरोबर किंग्ज इलाव्हन पंजाबनेही सेहवाग आणि ओम प्रकाशजींच्या भेटीचे फोटो ट्विटरवरून शेयर केले आहेत. 

आत्तापर्यंत पंजाबने यावर्षीच्या आयपीएलमध्ये तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. यात पंजाबने  दिल्लीवर आणि चेन्नईवर विजय मिळवला आहे तर बेंगलार विरूद्ध पराभव स्विकारला आहे.