गेल्या ९ सामन्यात रहाणेचे ६वे अर्धशतक

0 106

इंदोर । मुंबईकर अजिंक्य रहाणे सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मिळालेल्या कोणत्याही संधीचे सोने केल्याशिवाय रहात नाही. शिखर धवनने कौटुंबिक कारणामुळे पहिल्या तीन सामन्यातून माघार घेतल्यामुळे अजिंक्य रहाणेला सलामीला खेळण्याची संधी मिळाली.

हा खेळाडू या प्रत्येक संधीचे सोने करत आहे. या मुंबईकर खेळाडूने आज रोहित शर्मा बरोबर सलामीला येत ५२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे गेल्या ९ वनडेत रहाणेने ६व्यांदा अर्धशतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने ७ चौकर मारले. हे रहाणेनेचे वनडेतील २१वे अर्धशतक आहे.

आज या दोन मुंबईकर खेळाडूंनी सलामीला येत संघासाठी अभेद्य अशी शतकी भागीदारी केली.

Comments
Loading...
%d bloggers like this: