झुलन गोस्वामी पाठोपाठ आता मिताली राजवरही चित्रपट

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजवर लवकरच चित्रपट बनणार आहे. मितालीच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे सर्व हक्क Viacom18 Motion Pictures ने विकत घेतले आहे.

“आम्हाला या चित्रपटासाठी मिताली राज बरोबर भागीदारी करून आनंद होत आहे. हे एक मोठे नाव असून महिला क्रिकेटमध्ये बदल होण्यास कारणीभूत ठरले आहे. “ असे Viacom18 Motion Picturesचे अजित अंधारे म्हणाले.

मिताली राजनेही यावर भाष्य केले आहे. ” मला Viacom18 Motion Pictures बरोबर माझ्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटासाठी भागीदारी केल्याचं आनंद होत आहे. हा चित्रपट देशातील तरुण महिला क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा ठरेल अशी अपेक्षा आहे.”

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल एमएस धोनी, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर यापूर्वीच चित्रपट बनले आहेत. सध्या भारतीय महिला संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीवर चित्रपट बनवण्याची घोषणा झाली आहे तर १९८३ च्या भारतीय संघाच्या विजयावरही एक चित्रपट येत असून यात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग करत आहे.

बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिच्या जीवनावरही चित्रपट येत मुख्य भूमिकेत बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार आहे. त्यासाठी श्रद्धा बॅडमिंटनचे धडे खुद्द साईना नेहवालकडून घेत आहे.