पहिली कसोटी: सकाळच्याच सत्रात ९व्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला ४ धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले.

तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेल्यानंतर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ २ बाद ६५वरून पुढे सुरु झाला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात कोणतीही धाव काढण्यात आफ्रिकेच्या खेळाडूंना यश आले नाही. परंतु पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने हाशिम अमलाला रोहित शर्माकडे झेल द्यायला भाग पाडले.

सद्यस्थितीत आफ्रिकेकडे १४४ धावांची आघाडी असून सध्या एबी डिव्हिलिअर्स ० तर रबाडा ४ धावांवर खेळत आहे.