प्रो कबड्डी: भाऊ माझा पाठीराखा! सुरज देसाईने मोडला भाऊ सिद्धार्थचा विश्वविक्रम!

हैद्राबाद। प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात 8 वा सामना बुधवारी(24 जूलै) तेलगु टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली संघात पार पडला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात दबंग दिल्लीने 34-33 अशा फरकाने विजय मिळवला. असे असले तरी या सामन्यात तेलगू संघाकडून खेळणारे देसाई बंधू चमकले.

या दोघांनी मिळून तेलगूसाठी 26 पॉइंट्स मिळवले होते. यातील 18 पॉइंट्स एकट्या सुरज देसाईने मिळवले. तर सिद्धार्थने 8 पॉइंट्स मिळवले.

विशेष म्हणजे सुरजचा हा प्रो कबड्डीचा पहिलाच सामना आहे. त्यामुळे प्रो कबड्डीच्या पहिल्याच सामन्यात खेळताना सर्वाधिक पॉइंट्स मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे.

याआधी हा विक्रम त्याचा लहान भाऊ सिद्धार्थच्या नावावर होता. सिद्धार्थने मागीलवर्षी यू मुम्बा संघाकडून प्रो कबड्डीमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात 15 पॉइंट्स मिळवले होते.

सुरजने मिळवलेल्या 18 पॉइंट्समध्ये 13 रेड पॉइंट्सचा आणि 5 बोनस पॉइंट्सचा समावेश आहे.

सुरजला याआधी प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात जयपूर पिंक पँथर्सने घेतले होते. पण तो त्यावेळी सेनादलमध्ये असल्याने त्याला खेळता आले नव्हते. तसेच त्याला नंतर दबंग दिल्लीनेही संघात घेतले होते. परंतू त्याला दुखापत झाल्याने तो एकही सामना खेळला नव्हता.

त्यामुळे दोनदा प्रो कबड्डीमध्ये खेळण्याची संधी मिळूनही खेळता न आलेल्या सुरजने अखेर 7 व्या मोसमात प्रो कबड्डीत शानदार पदार्पण केले आहे.

या सामन्यात तेलगू संघाकडून देसाई बंधूंव्यतिरिक्त विशाल भारद्वाजने 4, अमित कुमारने 2 आणि फरहद मिलाघरदानने 1 पॉइंट मिळवला.

तसेच या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या दिल्लीकडून नवीन कुमारने शानदार कामगिरी करताना नवीन कुमारने 14 पॉइंट्स मिळवले. तर चंद्रन रणजीतने 6, जोगिंदर नरवाल 4, रविंद्र पेहलने 3, मेराज शेखने 2 आणि विजयने 1 पॉइंट मिळवला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

गौतम गंभीर आता क्रिकेटच्या नाही तर उतरला कबड्डीच्या मैदानात!

मुलाखत: फायनल खेळून ट्रॉफी जिंकावी हाच निर्धार – कर्णधार जोगिंदर नरवाल