जेव्हा विराट करतो नेहराची थट्टा, विडिओ व्हायरल !

विराट कोहली एका शोमध्ये नुकताच येऊन गेला. या शोचा व्हिडीओ सध्या युट्युबवर वायरल झालाय. त्यात विराटने भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराबद्दल गमतीशीर गोष्टी सांगितल्या. या शोमध्ये गौरव कपूर विराटची मुलाखत घेत होता.

गौरव कपूरने विराटला आशिष नेहराविषयी प्रश्न विचारला तेव्हा विराटने नेहरा कसा विनोदी आहे हे स्पष्ट करताना सांगितले की “नेहरा विनोदी बनण्याचा प्रयत्न नाही करत पण तो विनोदी आहे आणि तेच आम्हाला त्याच्याबद्दल आवडत.”

पुढे विराट म्हणाला “तुम्ही फक्त त्याच्या जवळ जाऊन बसू शकता कारण तो जेव्हा बोलायला सुरु करतो त्यानंतर त्याच बोलणं संपतच नाही. तो त्याच्या पूर्ण दिवसाचे नियोजन सांगतो- सकाळ पासून ते रात्रीपर्यंतचे सगळे. आणि जर तुम्ही त्याच बोलणंमध्ये तोडण्याचा प्रयत्न केला तर मग झालाच मग नेहरा सगळं सांगतो मी नाश्त्याला हे खाल्लं दुपारी हे, ह्या वेळेला हे, आणि दुपारी हे झालं रात्री असं झालं. मी तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त मला विचारा.”

पुढे विराट नेहराबद्दल आदर आहे हे सांगताना म्हणाला काहीही असलं तरी “नेहरा एक चांगला माणूस आहे”.

जेव्हा गौरव कपूर म्हणाला की नेहरा काय बोलतो हे विनोदी नसत पण तो ज्याप्रकारे बोलतो ते खूप विनोदी असत आणि याला विराट पुष्टी देत म्हणाला “तेच तर तो विनोदी नाहीये. तीच तर उत्तम गोष्ट आहे की तो कधीही विनोदी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणूनच आम्हाला त्याच्या आजूबाजूला असणे आवडत.”

विराट शेवटी म्हणाला “आशु भाई मस्त आहे. आता आम्ही टी २० मालिकेसाठी भेटणारच आहोत.” त्यावर पुढे या विषयाचा शेवटाकडे जाताना गौरव कपूर म्हणाला की १२ शस्त्रक्रियेनंतरही खेळणे म्हणजे खरंच दाद देण्यासारखी गोष्ट आहे. त्यावर विराटला वाटलं गौरव म्हणतोय दात देण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यावर विराट खळखळून हसला आणि म्हणाला “तू आधी त्याच्याविषयी बोललास आणि आता त्याच्या दातांबद्दल बोलतोयेस. त्यांना दात देण्याची नाहीत त्यांच्याकडून घेण्याची गरज आहे” असे विराटने हसून सांगितले.

आशिष नेहरा हा भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये दुसरा सार्वधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने २६ टी२० सामन्यात ३४ बळी घेतले आहेत.