अजिंक्य रहाणेवरून विनोद कांबळी -आकाश चोप्रामध्ये जोरदार खडाजंगी !

मुंबई । भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या फॉर्मवरून क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीमध्ये ट्विटरवर जोरदार खडाजंगी झाली.

“अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेला जाण्याआधी तिसऱ्या क्रमांकावर येऊन धावा करेल. चांगला निर्णय. ” असा एक ट्विट आकाश चोप्राने केला होता.

त्यावर विनोद कांबळीने आकाश चोप्राला विचारले, ” तू सांगू शकतोस का की राहणे कसा तिसऱ्या क्रमांकावर येऊन धावा करेल? तुझ्या काही सूचना आहेत का? “

पुन्हा विनोद कांबळीने ट्विट करत चोप्राला सूचना, सल्ला किंवा पर्याय विचारले.

यावर आकाश चोप्राने कोणतेही उत्तर न दिल्यामुळे सकाळच्या शुभेच्छा देत विनोद कांबळीने पुन्हा ट्विट केला. संपूर्ण भारतातील क्रिकेट फॅन्सला हे माहित पाहिजे की तो कसा धावा करेल?

यावर आकाश चोप्राने ट्विट करत म्हटले, ” आपण येथे भांडण्यापेक्षा फोनवर बोलू. तुला माहित आहे माझा फोन नंबर कुठे मिळेल. तसेच देशातील कोणत्या क्रिकेट फॅन्स याची माहिती हवी आहे ते पण सांग. “

तत्पूर्वी विनोद कांबळीने अजिंक्य रहाणेची जोरदार पाठराखण करताना एक चांगली खेळी करून रहाणे लवकरच फॉर्ममध्ये येईल असे म्हटले आहे.