पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पर्थ येथे आॅप्टस स्टेडीयमवर 14-18 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

आॅप्टस स्टेडीयमवरिल हा पहिलाच कसोटी सामना होता. आयसीसीच्या डिसप्लनरी सिस्टमच्या नुसार खेळपट्टीचा सामन्यानंतर मॅच रेफ्री दर्जा ठरवतात. त्यामुळे पर्थ कसोटीनंतरही मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी आॅप्टस स्टेडीयमच्या खेळपट्टीला साधारण खेळपट्टीचा दर्जा दिला आहे, असे cricket.com.au च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हा दर्जा आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोेलंदाज मिशेल जॉन्सनला पटलेला नाही. त्यामुळे त्याने त्याची नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

जॉन्सन म्हणाला, ‘यात काहीही चूकीचे नाही. या सामन्यात बॅट आणि चेंडूमधील द्वंद्व पहाणे रोमांचकारी होते. पाटा खेळपट्टीपेक्षा ही खेळपट्टी चांगली होती. जिथे फलंदाजी आणि गोलंदाजीला बरोबरीची संधी मिळाली. त्यामुळे मला जाणून घ्यायचे आहे की नक्की चांगली खेळपट्टी म्हणजे काय असते. आशा आहे की मेलबर्नमध्ये रोमांचकारी सामना पहायला मिळेल.’

यावर जॉन्सनला एका चाहत्याने उत्तर देताना म्हटले आहे की पहिल्या सत्रात अनियमित उसळ होती, त्यामुळे तूला असे वाटते का की ती परिस्थिती योग्य होती. त्यावर जॉन्सन म्हणाला, खेळपट्टी खराब होते त्यामुळे अनियमित उसळ खूपवेळा होत असते.

या वादात भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने उडी घेत ट्विट केले आहे की ‘विहारीने पहिल्या दिवशी उसळी घेतलेल्या चेंडूवर स्थिर झालेल्या हॅरिसची विकेट घेतली होती. याबद्दल काय?’

त्याच्या या प्रश्नावर जॉन्सनने उत्तर दिले आहे की, हा प्रश्न चुकीचा आहे, तू म्हणत आहेस की फिरकी गोलंदाजाकडून आलेला तो चेंडू धोकादायक आहे? तू पाहिले का भारताचे 4 वेगवान गोलंदाजांचे आक्रमण, ज्याची मी चाहता म्हणून मजा घेतली आणि ते पाहणे आनंददायी होते. तूझ्यासाठी चांगली खेळपट्टी काय आहे?’

आकाश पुढे म्हणाला ‘तू नैसर्गिक पणे येणाऱ्या उसळीतील वैविध्यबद्दल बोलत आहेस. पण पहिल्या दिवशीच उसळीत विविधता होती. त्यावेळेस ते धोकादायक नव्हते. पण चौथ्या दिवशी शमीचे चेंडू धोकादायक वाटत होते. मला वाटते की खेळाडूंची सुरक्षितता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा दर्जा देण्यात आला आहे.’

या ट्विटवर जॉन्सनने असहमतता दाखवली आहे. त्यांचे हे वाद पुढेही चालू होते. दोघेही त्यांचे मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते.

जॉन्सनचे म्हणणे होते की यापेक्षाही धोकादायक खेळपट्टीवर आहेत ज्यांना दर्जा देण्यात आलेला नाही. तर आकाशचे म्हणणे होते की आयसीसीने हा दर्जा दिला आहे त्यावर मी सहमत आहे आणि तू नाही. आपल्याला मते मांडायचा अधिकार आहे.

अखेर आकाशने जॉन्सनला नाताळच्या शुभेच्छा देत हा वाद संपवला आहे.

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकल वेगन यांनीही ही खेळपट्टी चांगली होती, असे मत मांडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल लिलावात करोडपती झालेल्या खेळाडूला अश्विनने केला थेट आॅस्ट्रेलियावरुन काॅल

कोहली-कुंबळे वादाबद्दल भारताच्या या दिग्गज खेळाडूने केला मोठा खूलासा

विराट कोहली सेना कंट्रीजमध्ये कमनशीबीच, नकोसा विक्रम झाला नावे