विराट कोहलीने दिले आमिर खानला खास ‘गिफ्ट’

मुंबई । काल बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे दिवाळीसाठी शूट केलेल्या एका खास ‘कॅन्डीड चाट’ शो साठी एकत्र आले होते.

आमिर खान सध्या त्याच्या सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाच्या चित्रीकरणात सिंगापूरला व्यस्त आहे परंतु या कार्यक्रमाच्या खास शूटसाठी तो मुंबईला आला होता.

दोंन्ही दिग्गजांच्या चाहत्यांनी यावेळी विराट आणि आमिर एकत्र असलेले अनेक फोटो शेअर केले. यात विराटने हातात क्लॅपबोर्ड तर आमिरने हातात भारतीय संघाची जर्सी पकडलेली दिसते. आमिर खानला चित्रपटांचे क्लॅपबोर्ड जमा करण्याचा छंद आहे. यावेळी आमिरने विराटला दंगल चित्रपटाचा क्लॅपबोर्ड भेट दिला. विराटानेही यावेळी आमिरला भारतीय संघाची जर्सी तर त्याचा मुलगा आझादला सही केलेली बॅट दिली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली टी२० ७ ऑक्टोबर रोजी रांची येथे होणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे मालिकेत विजय मिळवला आहे.