तिसऱ्या टी२० सामन्याला आमिर खान लावणार हजेरी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि मालिकेचे विजतेपद ठरवणारा सामना आज हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने चांगले पुनरागमन केले आहे.

क्रिकेट प्रेमींना आणखीन एक भेट या सामन्यात मिळणार आहे. या सामन्याला बॉलीवूडचा परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अमीर खान हजेरी लावणार आहे.

अमिरचे सामन्याला हजेरी लावण्याचे कारण

या आधी ही २०११च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंचे प्रोसाहन वाढवण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आला होता. पण या सामन्याला अमीर खानने हजेरी लावणे थोडे आश्चर्यकारक आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने अमीर खानला एका चर्चा सत्रात सामन्याला येण्यासाठी आमंत्रित केले होते.

या चर्चा सत्रात अमिरने विराटला त्याच्या येणाऱ्या चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखवला. तर विराटने भारताची जर्सी देऊन अमीरला सामन्यासाठी आमंत्रित केले होते.

“जेव्हा विराट सामन्यासाठी आमिरला आमंत्रित केले तेव्हा त्याने लगेचच ते आपल्या वेळापत्रकात समाविष्ट केले. तो त्याच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील सहकलाकार झैर वासिम बरोबर सामन्याला हजेरी लावणार आहे. सामन्यापूर्वी आमिर संघाला भेटेल.” असे सूत्रांनी सांगितले.