इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस

0 59

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज एरॉन फिंचने किया टी-२० लीगमध्ये अफलातून कामगिरी केली. फिंचने आपल्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर संघाला १९४ धावसंख्येपर्यंत नेले आणि आपले शतक करत ११४ धाव फलकावर नोंदवल्या.

आपले कारकिर्दीतले ३ शतक करत फिंचने एक भन्नाट कामगिरी केली. त्याने १८ व्या षटकात तब्बल ३० धावा केल्या, ज्यात ४ षटकार आणि १ चौकाराचा समावेश आहे. या बलाढ्य धावसंख्येमुळे फिंचचा संघ सरेने हा सामना १७ धावांनी जिंकला.

या आगोदर २०११ साली ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना कोची टस्कर्स केरला संघाविरुद्ध तब्बल ३७ धावा केल्या होत्या. गेलने ४ षटकार (१ नो बॉल वर षटकार) आणि ३ चौकार मारत ३७ धावा केल्या होत्या.

Comments
Loading...
%d bloggers like this: