विश्वचषकात खेळणाऱ्या स्मिथ-वाॅर्नर जोडीबद्दल फिंचने केले मोठे वक्तव्य

30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत.

त्यांच्यावर मागीलवर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणी 1 वर्षाची बंदी घातली होती. ही एक वर्षाची बंदी पूर्ण झाल्यानंतर आता स्मिथ आणि वॉर्नर या दोघांचेही ऑस्ट्रेलियाच्या संघात विश्वचषकासाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता एक वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम करणार असल्याने स्मिथ आणि वॉर्नरच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे.

त्याच्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच म्हणाला, स्मिथ आणि वॉर्नर या जोडीला विश्वचषका दरम्यान सुरक्षितता देण्यासाठी सर्वकाही करण्यात आले आहे.

विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये ऍशेस मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या इंग्लंड दौऱ्यात चेंडू छेडछाड प्रकरणामुळे स्मिथ आणि वॉर्नरवर प्रेक्षकांकडून निंदा केली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीनेही याआधीच चाहत्यांना या खेळाडूंवर वैयक्तिक टिप्पण्णी न करण्याची विनंती केली आहे.

तसेच डेली मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार वॉर्नरच्या व्यवस्थापकाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरक्षिततेचे आश्वासन घेतले आहे. कारण वॉर्नरची पत्नी त्यांच्या तिसऱ्या अपात्याला ब्रिटनमध्ये जन्म देणार आहे.

त्याचबरोबर स्मिथ आणि वॉर्नरबद्दल ऑस्ट्रेलियाचा वनडे कर्णधार फिंच गुरुवारी कर्णधारांच्या संवाद सत्रात म्हणाला, ‘ते जेव्हापासून संघात परत आले आहेत आणि मागील काही आठवड्यात स्थिर झाले असल्याने ते शानदार खेळत आहेत. त्यांनी त्यांना शक्य असलेले योगदान दिले आहे आणि त्यांचे मनोबल अविश्वसनीय आहे.’

‘जसे विश्वचषक सुरु होईल तसे तूम्ही स्पर्धेत अधिक सामिल व्हायला सुरुवात होईल. कदाचीत इंग्लड विरुद्धच्या सामन्यात आणि नंतर ऍशेस मालिकेतही प्रेक्षकांचा काही प्रमाणात सहभाग असणार आहे. पण ते अपेक्षित आहे.’

‘तूम्ही जिथेही जाणार तिथे चाहते मोठी भूमिका निभावणार आहेत.’

‘यात काही शंका नाही की त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि एक संघटना म्हणून काही गोष्टी निश्चित केल्या आहेत. पण ज्याप्रकारे ते या स्पर्धेसाठी तयारी करत आहेत ते शानदार आहे.’

या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 1 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. त्याआधी ते 25 मे ला इंग्लंड विरुद्ध तर 27 मे ला श्रीलंका विरुद्ध सराव सामने खेळणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक होतोय त्या देशात शतकी खेळी केल्यावर रहाणे म्हणाला…

मिस्टर ३६० एबी डीव्हिलीयर्सचे ते स्वप्न आजही आहे अधुरे

विराटला हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हवा आहे भारतीय संघात…