रमेश देसाई मेमोरियल कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आयुश भट, कुंदना बंडारू यांना दुहेरी मुकुटाची संधी 

दुहेरीत मुलांच्या गटात आयुश भट व आर्यन शहा यांना, तर मुलींच्या गटात कुंदना बंडारू व अनन्या एसआर यांना विजेतेपद 

मुंबई, १८ मे २०१७: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित ११व्या रमेश देसाई मेमोरियल कुमार(१२वर्षाखालील)टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कर्नाटकाच्या आयुश भट याने, तर मुलींच्या गटात तामिळनाडूच्या कुंदना बंडारू यांनी दुहेरी गटात विजेतेपद पटकावत एकेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.

 

जी.ए, रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत कर्नाटकच्या व अव्वल मानांकित आयुश भट याने आपली विजयी मालिका कायम ठेवत सोळाव्या मानांकित व महाराष्ट्राच्या ईपन जोशुआ याचा ६-२, ६-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पश्चिम बंगालच्या व पाचव्या मानांकित अरुणवा मजुमदार याने  काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या कर्नाटकच्या स्कंधा रावचा ७-५, ६-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत अरुणवा मजुमदारचा सामना अव्वल मानांकित आयुश भट याच्याशी होणार आहे. दुहेरीत अंतिम फेरीत आयुश भटने आर्यन शहाच्या साथीत ओब्रेन व्यात व अरुणवा मजुमदार या जोडीचा ३-६, ६-३, १०-५ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात एकेरीत उपांत्य फेरीत गुजरातच्या व अव्वल मानांकित सिद्धी खंडेलवालने महाराष्ट्राच्या सोनल पाटीलचा ६-१, ६-३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तामिळनाडूच्या कुंदना बंडारू हिने दुसऱ्या मानांकित व महाराष्ट्राच्या परी सिंगला ६-३, ६-३ असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. याच गटात दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत कुंदना बंडारू व अनन्या एसआर यांनी अभया वेमुरी व अपूर्वा वेमुरी यांचा ३-६, ६-४, १०-८ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: एकेरी गट: मुले: 

आयुश भट(कर्नाटक,१)वि.वि.ईपन जोशुआ(महा,१६)६-२, ६-०;

अरुणवा मजुमदार(पश्चिम बंगाल, ५)वि.वि.स्कंधा राव(कर्नाटक)७-५, ६-१;

 

१२ वर्षाखालील मुली: 

सिद्धी खंडेलवाल(गुजरात,१)वि.वि.सोनल पाटील(महा)६-१, ६-३;

कुंदना बंडारू(तामिळनाडू)वि.वि.परी सिंग(महा,२)६-३, ६-३; 

 

दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले:

आयुश भट/आर्यन शहा वि.वि.ओब्रेन व्यात/ अरुणवा मजुमदार ३-६, ६-३, १०-५;

मुली:

कुंदना बंडारू/अनन्या एसआर वि.वि.अभया वेमुरी/अपूर्वा वेमुरी ३-६, ६-४, १०-८.   –