डिव्हिलियर्स वादळाचा तडाखा, केले शानदार पुनरागमन

एबी डिव्हिलिर्यने मंगळवारी रात्री झान्सी प्रीमियर लीगमध्ये सराव सामन्यात शानदार कामगिरी केली. त्वेवाने स्पार्टन विरुद्ध जोसी स्टार्स यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने धुव्वादार फलंदाजी केली.

स्पार्टन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद २१७ धावा केल्या. यातील ९३ धावा एकट्या डिव्हीलियर्सने केल्या होत्या. या धावा करताना त्याने केवळ ३१ चेंडू खेळले. या खेळीतील त्याचा स्ट्राईक रेट हा तब्बल ३००चा होता.

३४ वर्षीय एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केल्यानंतर प्रथमच कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भाग घेतला होता.

त्याची ही खेळी इतकी जबरदस्त होती की दक्षिण आफ्रिकेचा संघ २०१९ विश्वचषकात त्याच्याविना कसा खेळेल हाच प्रश्न पडावा.

दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज आता शुक्रवारी एमएसएलमध्ये स्पार्टन विरुद्ध केपटाऊन ब्लित्झ यांच्यातील सामन्यात न्यूलॅंडमध्ये खेळताना दिसेल.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

बालदिनाचे औचित्य साधून केकेआरने केले हे खास सेलिब्रेशन, पहा फोटो...

सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!

युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा

१४१ वर्षांत क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली गोष्ट काल घडली