डिव्हिलियर्सचे शतक तर हुकले, परंतू विक्रम करण्यात नाही राहिला मागे

बंगळुरू। रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात पार पडलेल्या सामन्यात बेंगलोरने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बंगलोरच्या विजयात आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने अर्धशतकी खेळी करून महत्वाची कामगिरी बजावली.

दिल्लीने बेंगलोरसमोर 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरचे सलामीवीर मनन वोहरा(2) आणि क्विंटॉन डिकॉकने(18) लवकर विकेट्स गमावल्या.

मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने संघाचा डाव सांभाळताना विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. परंतू कोहली बाद झाल्यावर जादा पडझड होऊ न देता एबी डिव्हिलियर्सने संघाला विजय मिळवून दिला. 

या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने अनेक विक्रम केले ते असे-

– बेंगलोरला अायपीएलमध्ये १५०० धावा पुर्ण

– बेंगलोरकडून ३००० धावांचा टप्पा पार

-बेंगलोरकडून आयपीएलमध्ये ३००० धावांचा टप्पा पार

-आयपीएलमधील १६वा सामनाविराचा पुरस्कार