एबी डिव्हीलियर्स एक्सप्रेस काही थांबेना! पुन्हा एकदा धमाकेदार खेळी

सेंच्यूरियन। गुरुवारी(12 डिसेंबर) ला मझांसी सुपर लीग स्पर्धेत सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्यूरियन येथे डर्बन हिट विरुद्ध  त्श्वान स्पार्टन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात डर्बन संघाने एल्बी मॉर्केलने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 2 विकेट्सने विजय मिळवला.

पण या सामन्यात यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी डिव्हीलियर्सचीही तुफानी फलंदाजी पहायला मिळाली आहे. त्याने त्श्वान स्पार्टन्सकडून प्रथम फलंदाजी करताना 52 चेंडूत नाबाद 93 धावांची खेळी केली आहे. यात त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच इयान मॉर्गन बरोबर 62 धावांची भागीदारीही केली. यात मॉर्गनने 7 धावाच केल्या.

त्यांच्या भागीदारीमुळे त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 188 धावा करत 189 धावांचे आव्हान डर्बन संघासमोर ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना डर्बन संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी 61 धावातच 5 विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर एल्बी मॉर्केलने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत 28 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी करताना 5 षटकार आणि 4 चौकार मारले.

मॉर्केलला हेन्रीक क्लासेन(36) आणि केशव महाराज(27) यांनी चांगली साथ दिली. त्याच्यामुळे  डर्बन संघाने 1 चेंडू राखून विजयही मिळवला.

मात्र या सामन्यात डिव्हीलियर्सची आक्रमक खेळी डर्बन संघाच्या सांघिक कामगिरीपुढे फिकी पडली. या सामन्यात मॉर्केलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या:

हा विक्रम पहाच, विश्वास बसेल की भारत आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणार आहे

आॅस्ट्रेलियन गोलंदाज नजरकैदेत, ड्रोनच्या सहाय्याने संघ व्यवस्थापनाने लढवली ही शक्कल

तरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग