एबी डिव्हिलियर्सने केले १९ चेंडू ५० धावा !

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आज टायटन्स विरुद्ध लायन्स संघात झालेल्या १५ षटकांच्या सामन्यात टायटन्स संघाकडून खेळताना १९ चेंडूत ५० धावा केल्या. या सामन्यात टायटन्सने ८ विकेट्सने  विजय मिळवला.

लायन्स संघाने १५ षटकात ६ बाद १२७ धावा केल्या होत्या परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार टायटन्स संघाला १५ षटकात १३५ धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य पार करताना टायटन्स संघाचा सलामीवीर क्वीनटन डी कॉकने ३९ धावा करत आक्रमक सुरुवात दिली.

त्यानंतर डिव्हिलियर्सने १९ चेंडूत ५० धावा करताना ५ षटकार आणि ३ चौकार मारले.त्याच बरोबर त्याचा संघ सहकारी आणि कर्णधार ऍल्बी मॉर्केलने देखील १६ चेंडूंत ४१ धावा केल्या. ज्यामुळे टायटन्स संघाने १२ व्या षटकातच ८ विकेट्सने या सामन्यात विजय मिळवला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लायन्सने रिझा हेन्ड्रिक्सच्या ४२ चेंडूत ६७ धावांच्या जोरावर १५ षटकात १२७ धावा केल्या. हेन्ड्रिक्सच्या या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले.

टायटन्स संघाकडून ऍल्बी मॉर्केलने लायन्स संघाच्या सलामीवीरांना पहिल्या षटकातच बाद करत त्यांच्यावर दबाव आणला होता. या सामन्यात मॉर्केलने एकूण ३ बळी घेतले.