टॉप १०: एबी डिव्हिलिअर्सची विक्रमांची दिवाळी, केले तब्बल १० विश्वविक्रम

0 635

आज बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरया वनडेत दक्षिण आफ्रिकेचं एबी डिव्हिलिअर्सने तुफानी फटकेबाजी करत १०४ चेंडूत १७६ धावा केल्या.

ही खेळी करताना या खेळाडूने अनेक विक्रम केले. ते असे…

१.
वनडेत आयसीसीचे सदस्य असणाऱ्या ९ मुख्य संघांविरुद्ध शतकी खेळी करणारा एबी डिव्हिलिअर्स केवळ ७वा खेळाडू. यापूर्वी सचिन, विराट, रॉस टेलर, हाशिम अमला, हर्षल गिब्स आणि रिकी पॉन्टिंगकडून ही कामगिरी

२.
यावर्षी वनडेत १७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा एबी ५वा खेळाडू. यावर्षी डुप्लेसीस, गप्टिल, वॉर्नर आणि लेविस यांनी ही कामगिरी केली आहे.

३.
एबी केवळ पहिला खेळाडू आहे ज्याने १५० धावा २वेळा १०० पेक्षा कमी चेंडूत केल्या आहेत.

४.
एबीने तब्बल ६वेळा ७० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत शतकी खेळी केली आहे. आजपर्यंत अन्य कोणत्याही खेळाडूला हा विक्रम ४ पेक्षा जास्त वेळा करता आला नाही.

५.
एबीने डिव्हिलिअर्सने आजपर्यंत वनडेत २५ शतके केली आहेत आणि या सर्व शतकांच्या वेळी त्याचा स्ट्राइक रेट हा कधीही १०० पेक्षा कमी नव्हता.

६.
वनडेत २५ शतके करताना सर्वात कमी डाव खेळणाऱ्या यादीत अमला(१५१), विराट(१६२) पाठोपाठ एबी (२१४) तिसऱ्या क्रमांकावर तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (२३४) या यादीत चौथा

७.
दक्षिण आफ्रिकेकडून जी ७ सर्वात वेगवान शतके वनडेत झाली आहेत त्यात ६ शतके एबीची आहेत.

८.
वनडेत ७५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत एबीने ९व्यांदा शतकी खेळी आहे. दुसऱ्या स्थानावर वीरेंद्र सेहवाग असून त्याने ही कामगिरी ६वेळा केली आहे.

९.
एबी-अमला जोडीने १२व्यांदा आफ्रिकेसाठी १०० धावांची भागीदारी केली आहे. हा आफ्रिकेसाठी विक्रम आहे.

१०.
एबी-अमला जोडीने ४३ डावात ३००० धावांची भागीदारी केली आहे. आफ्रिकेकडून केवळ ३ जोड्यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.

११.
आफ्रिकेकडून एका डावात सर्वाधिक धावा करायचा विक्रम हा गॅरी कर्स्टन यांच्या नावावर आहे. तब्बल २१ वर्ष हा विक्रम अबाधित आहे. हा विक्रम मोडायची आज एबीला संधी होती. देशाकडून सार्वधिक कला वनडेत सर्वोच्च धावांचा विक्रम आपल्या नावे ठेवण्याचा विक्रम यामुळे गॅरी कर्स्टन यांच्या नावावर कायम राहिला.

१२.
या सामन्यात एबीने वनडे कारकिर्दीत २०१ षटकारांचा टप्पा ही गाठला.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: