एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

बेंगलुरू | गुरुवारी राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात बेंगलोरने हैद्राबादवर १४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी केलेल्या बेंगलोरने हैद्राबादसमोर २० षटकांत जिंकण्यासाठी २१९ धावांचे लक्ष ठेवले आहे.

एबी डिविलियर्स ६९, मोईन अली ६५, कोलिन डे ग्रॅडोहोम ४० आणि सर्फराज खान २२ यांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर बेंगलोरने २० षटकांत ६ विकेट गमावत २१८ धावा केल्या.

याला उत्तर देताना हैद्राबादने २० षटकांत ३ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. त्यात कर्णधार केन विलियमसन ८१ आणि मनिष पांडे ६२ यांनी चांगल्या धावा केल्या परंतु संघाला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरले.

या सामन्यात काल सर्वाधिक चर्चा जर कुणाची झाली असेल तर ती आहे एबी डी विलियर्सची. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशी दोन्ही आघाड्यांवर त्याने चमकदार कामगिरी केली.

फलंदाजीत त्याने १२ चौकार आणि १ षटकार खेचत ३९ चेंडूतच ६९ धावा केल्या तर क्षेत्ररक्षण करत असताना अॅलेक्स हेलचा मोईन अलीच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला.

अशा या खेळाडूवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो भारतीय चाहत्यांच सर्वाधिक प्रेम मिळालेला पहिला परदेशी खेळाडू आहे. एबी डिव्हिलियर्सवर प्रेम न करणारे चाहते भारतात चुकूनही सापडणार नाहीत.

म्हणुनच काल जेव्हा या खेळाडूने चांगली खेळी केली तेव्हा अनेकांची याचा संदर्भ कर्नाटकच्या २०१८ विधानसभा निवडणुकीशी लावत त्याला मुख्यमंत्री करण्याची मागणी सोशल माध्यमांवर केली.

‘एबी जर मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला शंभर टक्के पाठींबा मिळेल. त्याला कुणीही विरोधक नसेल.’ ‘राज्यपाल एबीला मुख्यमंत्री करा, कुणीही विरोध करणार नाही.’ ‘एबी जर भारतीय नागरिक असता तर बीजेपीने तर येदियुरप्पाला राजीनामा द्यायला सांगुन त्यालाच मुख्यमंत्री केले असते’ असे अनेक संदेश सध्या सोशल माध्यमांवर फिरत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?

-आयपीएल इतिहासात हा ठरला सर्वात महागडा गोलंदाज

संघ पराभूत झाला म्हणून काय झाले, तो विक्रम तर भारतीय खेळाडूच्या नावावर झाला

महिलांच्या ऐतिहासिक आयपीएल टी२०साठी संघांची घोषणा