एबी डिव्हिलिअर्सने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा विक्रम

 

बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडेत एबी डिव्हिलिअर्सने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. सर्वात कमी डावात २५ शतके करण्याचा विक्रम करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता एबी डिव्हिलिअर्स तिसऱ्या स्थानावर आला असून यापूर्वी सचिनच्या या स्थानावर होता.

एबी डिव्हिलिअर्सने हा विक्रम २१४ डावात केला आहे. तर सचिनने यासाठी २३४ डाव घेतले होते.

वनडेत सर्वाधिक कमी डावात २५ शतके करण्याचा विक्रम हाशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने १५१ डावात ही कामगिरी केली आहे तर भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीने १६२ डावात हीच कामगिरी केली आहे.

वनडेत कमीतकमी डावात २५ शतके करणारे खेळाडू
१५१ हाशिम अमला
१६२ विराट कोहली
२१४ एबी डिव्हिलिअर्स
२३४ सचिन तेंडुलकर