एबी डिव्हिलिअर्स करणार टी२० मध्ये आफ्रिकेचं नेतृत्व

एबी डिव्हिलिअर्स दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार पदावरून पायउतार होणार अशी बातमी असतानाच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. २१ जून पासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या टी२० मालिकेत एबी डिव्हिलिअर्स आफ्रिका संघाचं नेतृत्व करताना दिसेल.

दक्षिण आफ्रिका टी२० संघाचं नेतृत्व करणाऱ्या फाफ डुप्लेसीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी जेष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय आफ्रिकेने घेतला आहे. आफ्रिका इंग्लंडविरुद्ध ३ टी२० सामने खेळणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधार म्हणून केलेल्या सुमार कामिरीमुळे एबी डिव्हिलिअर्सवर जोरदार टीका होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १ विजय आणि २ पराभव अश्या खराब कामगिरीमुळे आफ्रिकेला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले तर त्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत २-१ असा पराभव पहावा लागला. त्यामुळे एबी डिव्हिलिअर्सकडे अतिरिक्त जबाबदारी दिल्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.