एबी डिव्हिलिअर्सने दिले निवृत्तीचे संकेत

टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार एबी डीव्हिलियर्सने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. डीविलीयर्स आपल्या क्रिकेट कारकीर्दीच्या भवितव्याविषयी गंभीरपणे विचार करू लागला असून येत्या ऑगस्ट महिन्यात तो क्रिकेट कारकीर्दीविषयी निर्णय घेणार असल्याचे समजते आहे.

नुकताच  दक्षिण आफ्रिका संघाला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही २-१ असाच पराभव पत्करावा लागला . त्याशिवाय, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही दक्षिण आफ्रिकेला आपल्या लौकिकाप्रमाणे खेळ करता आला नाही .यात डीविलीयर्स ची कामगिरी देखील सामान्यच राहिली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत बहुधा डीव्हिलियर्स खेळणार नाही. सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत त्याने दिले आहेत.