पहा ७३ चेंडूंत १६१ धावा करणाऱ्या अॅडम लीथची शतकी खेळी

इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या नेटवेस्ट टी२० ब्लास्टमध्ये रोज काहीतरी नवीन घडत असते. अगदी वेगवेगळ्या मनोरंजक गोष्टींपासून ते टी२० मधील काही रेकॉर्डस्.

कालही यॉर्कशायर आणि नॉर्थनट्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात यॉर्कशायरच्या अॅडम लीथने शतकी खेळी करताना फक्त ७३ चेंडूत १६१ धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने तब्बल २० चौकार आणि ७ षटकार खेचले. त्यामुळे यॉर्कशायर संघाला तब्बल १२४ धावांनी विजय मिळाला.

टी२० प्रकारातील ही तिसरी सर्वोच्च खेळी होती. यापूर्वी ख्रिस गेल (१७५*), मसाकाझा (१६२*) यांनी पहिल्या दोन सर्वोच्च खेळी केल्या आहेत. २६०/४ या टी२० क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेली चौथी मोठी धावसंख्या ठरली आहे.

पहा अॅडम लीथची ही तुफानी खेळी: