एकही धाव, झेल किंवा विकेट न घेणाऱ्या खेळाडूला मिळाले ११ लाख

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध 1 डाव आणि 159 धावांनी मोठा विजय मिळवला.

मात्र या सामन्यात इंग्लंडच्या 11 जणांच्या संघात आदिल रशीद हा असा एक खेळाडू आहे ज्याला एकही धाव आणि एकही विकेट घेता आली नाही. तसेच त्याला या सामन्यात एकही झेल किंवा स्टपिंगही करता आले नाही.

रशीद हा एका कसोटी सामन्यात असा विक्रम करणारा एकूण 14 वा खेळाडू ठरला असुन 13 वर्षांमधील पहिलाच इंग्लंडचा खेळाडू ठरला आहे.

याआधी इंग्लंडकडून अशी शेवटची कामगिरी गॅरेथ बॅटी यांनी 2005 मध्ये बांगलादेश विरुद्ध लॉर्ड्समैदानावरच केली होती.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रुटने वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची साथ मिळत असल्याने फिरकी गोलंदाज रशीद खानला पर्याय म्हणून ठेवले. परंतू त्याची या सामन्यात नंतर गरज न लागल्याने त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही.

असे असले तरी एका रिपोर्टनुसार त्याला सामना फी म्हणून 11,09,220 रुपये मिळणार आहेत.

या सामन्यात इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 9, स्टुअर्ट ब्रॉडने 5 आणि ख्रिस वोक्सने 4 आणि सॅम करनने 1 विकेट घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती

तिसऱ्या कसोटीत आर अश्विन टीम इंडियाचा कर्णधार?

पाकिस्तानी कर्णधार म्हणतो, टीम इंडियाला आशिया चषकात आम्हीच वरचढ