एएफसी आशियाई करंडक- बहरिन विरुद्धचा सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा

अबुधाबी।  एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताची आज ( 14 जानेवारी) बहरिन विरुद्ध लढत होणार आहे. अल शारजाह स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे.

या स्पर्धेत भारत चौथ्यांदा सहभागी होत असून 1964ला ते उपविजेता ठरले होते. या स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात थायलंडला 4-1 असे पराभूत करत विजयी सुरूवात केली होती. मात्र अरब अमिराती विरुद्धच्या सामन्यात 2-0 असा पराभव स्विकारावा लागल्याने भारतासाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे.

1972ला पहिल्यांदा या स्पर्धेत बाद फेरीचे सामने खेळले गेले होते. त्यानंतर भारत दोन वेळा या स्पर्धेत खेळला असून साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता.

आजच्या सामन्यात भारताला एक जरी गुण मिळाला तर ते उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. गुणतालिकेत भारत आणि थायलंड यांचे प्रत्येकी 3-3 गुण आहे. म्हणून थायलंड अरब विरुद्ध पराभूत झाला तरीही भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकतो.

बहरिन आणि भारत हे संघ आज सहाव्यांदा आमने-सामने येणार आहे. आधी झालेल्या पाच पैकी चार सामन्यात बहरिन विजेता ठरला आहे तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

भारताप्रमाणेच बहरिनसाठीही आजचा सामना महत्त्वाचा आहे. त्यांना पहिल्या सामन्यात अरब विरुद्ध 1-1 असे बरोबरीत समाधान मानावे लागले. तर थायलंड विरुद्ध 1-0 असा पराभव स्विकारावा लागला आहे.

या सामन्यात भारताकडून डिफेंडर्समध्ये प्रितम कोटल, अनस एदाथोडिका, सुभासिश बोस आणि संदेश झिंगन तर स्ट्रायकर्स सुनिल छेत्री आणि आशिक कुरूनियान खेळू शकतात. तर गोलकिपरमध्ये गुरप्रीत सिंग संधूने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून त्याला आजच्या सामन्यात संधी मिळू शकते.

भारतीय संघ:

गोलकिपर- गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, अरिंदम भट्टाचार्य, विशाल केथ

डिफेंडर्स- प्रितम कोटल, सार्थक गोलूइ, संदेश झिंगन, अनस एदाथोडिका, सलाम रंजन सिंग, सुभासिश बोस, नारायन दास, लालरूथ्थारा

मिडफिल्डर्स- उदांता सिंग, जॅकीचंद सिंग, प्रोणय हल्दर, विनीत राय, रोवलीन बोर्जेस, अनिरूध थापा,  जेर्मन पी सिंग, आशिक कुरूनियान, हलिचरण नारझरय, लल्लीझुआला छांगटे,

फॉरवर्ड- सुनिल छेत्री (कर्णधार), जेजे लापेखलुआ, सुमित पस्सी, फारूख चौधरी, बलवंत सिंग, मानवीर सिंग

महत्त्वाच्या बातम्या-

या कारणामुळे किंग कोहली कांगारूंना नडणार…

दुसऱ्या वनडेसाठी या खेळाडूंना मिळू शकते अंतिम ११ जणांच्या टीम इंडियात संधी

कांगारूंच्या भूमीत कांगारुंच्या महान खेळाडूचा विक्रम मोडणार रोहित