एशिया कपसाठी कर्णधार सुनिल छेत्रीची टीम इंडिया तयार

एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन (एएफसी) किंवा एशिया कप 5 जानेवारी 2019 पासून सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघ चौथ्यांदाच सहभागी होत आहे.

या स्पर्धेत 24 देश सहभागी होणार असून त्यांचे वेगवेगळे सहा गट तयार करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघ अ गटात असून त्यांचा पहिला सामना 6 जानेवारीला थायलंड विरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना 10 जानेवारीला युनायटेड अरब अमिराती (युएइ) विरुद्ध असून हे दोन्ही सामने अबुधाबीमध्ये आहेत. तिसरा सामना बहरीन विरुद्ध शारजाह येथे 14 जानेवारीला होणार आहे.

या स्पर्धेसाठी 28 जणांचा भारतीय संघ युएइमध्ये दाखल झाला आहे. त्याआधी भारताचा ओमान विरुद्ध मैत्रीपूर्ण सामना 27 डिसेंबरला आहे. तर 30 डिसेंबरला एका स्थानिक क्लबसोबत सामना होणार आहे.

एशिया कपमध्ये भारत याआधी 1964मध्ये पहिल्यांदा सहभागी झाला होता. तेव्हा ते  उपविजेते ठरले होते. नंतर भारत 1984 आणि 2011ला खेळले आहेत.

आताच्या संघातले अनेक खेळाडू इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) खेळले आहेत. यामुळे भारताला त्याची मदतच होणार आहे. तर कर्णधार सुनिल छेत्रीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा राहणार आहे.

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ 97व्या स्थानावर आहे. या स्पर्धेचा विजेता संघ फिफा कॉन्फिडरेशन कपसाठी पात्र ठरणार आहे.

भारतीय संघ:

गोलकिपर- गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, अरिंदम भट्टाचार्य, विशाल केथ

डिफेंडर्स- प्रितम कोटल, सार्थक गोलूइ, संदेश झिंगन, अनस एदाथोडिका, सलाम रंजन सिंग, सुभासिश बोस, नारायन दास, लालरूथ्थारा

मिडफिल्डर्स- उंदाता सिंग, जॅकीचंद सिंग, प्रोणय हल्दर, विनीत राय, रोवलीन बोर्जेस, अनिरूध थापा,जेर्मन पी सिंग, आशिक कुरूनियान, हलिचरण नारझरय, लल्लीझुआला छांगटे,

फॉरवर्ड- सुनिल छेत्री (कर्णधार), जेजे लापेखलुआ, सुमित पस्सी, फारूख चौधरी, बलवंत सिंग, मानवीर सिंग

महत्त्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र केसरी यशोगाथा ४- अबब! ६०० लढती १२४ पंच अन् चमचमणारी गदा

युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…

भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक