अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने केले स्टंपचे दोन तुकडे

डेहराडून। रविवारी अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने शापूर झारदान आणि रशीद खान यांनी प्रत्येकी घेतलेल्या 3 विकेटच्या जोरावर 45 धावांनी विजय मिळवला.

झारदानने घेतलेल्या 3 विकेटपैकी अबुल हसन आणि रुबेल हुसेन यांच्या विकेट त्याने त्रिफळाचीत करुन घेतल्या. हुसेनची विकेटच्या वेळी तर स्टंपचे दोन तुकडेच झाले इतका वेगवान चेंडू झारदानने टाकला होता.

ही विकेट त्याने आठराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतली. हुसेन या सामन्यातील त्याचा पहिलाच चेंडू खेळत होता. झारदानने टाकलेल्या या वेगवान चेंडूवर फटका मारण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतू त्याला फटका मारता न आल्याने चेंडू सरळ लेग स्टंपला लागला आणि त्या स्टंपचे दोन तुकडे झाले.

याच षटकात त्याने आधी चौथ्या षटकात अबुल हसनची विकेट घेतली होती. अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका ंसुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 5 जूनला डेहराडूनमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर होणार आहे. या मालिकेत अफगाणिस्तान 1-0 ने आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

६ पैकी त्या एका अॅवार्डमुळे कागिसो रबाडा होतोय सोशल मीडियावर ट्रोल!

प्रो-कबड्डीच आहे भारतातील दुसरी सर्वात लोकप्रिय लीग, काही वर्षात करेल आयपीएलची बरोबरी

Video: नदालने केले बॉलबॉयचे स्वप्न पूर्ण

बेन स्टोक्स नंतर इंग्लंडचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर

आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यावर एमएस धोनी दर्शनासाठी पोहोचला रांचीतील मंदिरात