देहरादूनमध्ये होणार 3 सामन्यांची टी-20 मालिका!

ढाका | बांग्लादेशने अफगाणिस्तान विरूध्दच्या एकदिवसीय मालिकेएेवजी 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्याचे ठरविले आहे.  2020 विश्वचषकाची तयारी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डच्या संचालकांनी मीरपूर येथे झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. यावेळी देहरादून हे या टी-20 मालिकेचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. याआधी बांग्लादेश क्रिकेटने हे सामने कोलकाता किंवा बेंगलार येथे घ्यायचे ठरवले होते.

” 2020 विश्वचषक जवळच आला आहे पण आम्ही खूप कमी टी-20 सामने खेळलो आहोत. यामुळेच आम्ही अफगाणिस्तान विरूध्द  टी-20 मालिका खेळण्याचे ठरवले आहे. कोलकाता आणि बेंगलार येथील मैदान या काळात व्यस्त असल्याने हे सामने देहरादूनमध्ये घेण्याचे ठरवले “, असे बांग्लादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी सांगितले.

अफगाणिस्तान भारतात आधी सामने खेळला आहे. यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटने हे सामने खेळण्यासाठी भारताची निवड केली आहे. तसेच बांग्लादेश क्रिकेटने हे सामने युएईत घेण्याचे ठरविले होते. याआधीच बीसीसीआयने अफगाणिस्तानला नोएडामधील शहिद विजय सिंग पाठक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 2015-16 च्या पूर्ण मोसमासाठी दिले होते.

अफगाणिस्तानला नुकताच कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळला आहे. ते कसोटी क्रिकेटमध्ये भारत विरूध्द कसोटी सामन्यात  पदार्पण करणार आहे. हा सामना 14 जूनला बेंगलोर येथे होणार आहे.

कदाचित या एेतिहासिक कसोटी सामन्याआधी बांग्लादेश सोबतची  टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे.