अफगाणिस्तान बोर्डाने मोहम्मद शहजादला सुनावली ही मोठी शिक्षा…

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी(10 ऑगस्ट) यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादचा करार अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केला आहे. त्याच्यावर अफगाणिस्तान बोर्डाच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की शहजादने दुसऱ्या देशात प्रवास करण्याआधी क्रिकेट बोर्डाची परवानगी घेण्याच्या धोरणाचे पालन केले नाही.

तसेच शहजाद 2018 मध्ये पेशावरमधील स्थानिक स्पर्धेत खेळल्याने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचेही आढळून आले आहे.

त्याचबरोबर बोर्डाने म्हटले आहे की विश्वचषक 2019 दरम्यान शिस्तबद्ध बाबींच्या संदर्भात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या डिसिप्लिन कमीटी(अनुशासन समीती) च्या बैठकीसाठीही शेहजाद उपस्थित राहिला नाही.

मागील महिन्यात 20 आणि 25 तारखेला तो डिसिप्लिन कमीटीच्या बैठकीसाठी हजर झाला नव्हता. आता ही कमीटी ईदच्या सुट्टीनंतर पुन्हा भेटेल आणि पुढील कारवाईची चर्चा करेल.

2019 विश्वचषकादरम्यान शेहजादला दुखापत असल्याचे सांगून स्पर्धेच्या अर्ध्यातूनच बाहेर करण्यात आले होते. त्यावेळी शेहजादने तो पूर्ण फिट असतानाही त्याला संघातून बाहेर काढल्याचा आरोप केला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टॉप ५: भारत-विंडीज संघातील दुसऱ्या वनडेत होणार हे खास ५ विक्रम

विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया

किंग कोहली हा मोठा पराक्रम करण्यापासून केवळ १९ धावा दूर