अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय इक्रम अली खीलने मोडला सचिन तेंडुलकरचा २७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

लीड्स। 2019 विश्वचषकात गुरुवारी(4 जूलै) अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 42 वा सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 23 धावांनी विजय मिळवत त्यांचा स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.

याबरोबरच या सामन्यात अफगाणिस्तानला पराभव स्विराकावा लागला असला तरी त्यांचा 18 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज इक्रम अली खीलने अर्धशतकी खेळी करत एक खास विश्वविक्रम केला आहे. त्याने वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून 93 चेंडूत 86 धावा केल्या आहेत.

त्यामुळे तो वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी विश्वचषकात सर्वोच्च धावांची खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने सचिन तेंडुलकरच्या 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

सचिनने 1992 च्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुदध 84 धावा केल्या होत्या. त्यावेळी सचिनचे वय 18 वर्षे 323 दिवस एवढे होते. तर इक्रमने 86 धावांची खेळी 18 वर्षे 278 दिवसांचे वय असताना केली आहे.

विशेष म्हणजे तो विश्वचषकात 80 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी सर्वात कमी वयात करणाराही फलंदाज ठरला आहे. हा विक्रम करतानाही त्याने सचिनच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

सचिनने 1992 च्या विश्वचषकातच न्यूझीलंड विरुद्ध 84 धावांची खेळी करण्याआधी झिम्बाब्वे विरुद्ध 81 धावांची खेळी केली होती. त्यावेळी सचिनचे वय 18 वर्षे 318 दिवस एवढे होते.

याबरोबर विश्वचषकात अर्धशतकी खेळी करणारा इक्रम हा तिसऱ्या क्रमांकाचा युवा खेळाडूही ठरला आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या या सामन्यात इक्रमला ख्रिस गेलने पायचीत बाद केले. इक्रमची या विश्वचषकासाठी सुरुवातीला अफगाणिस्तान संघात निवड झाली नव्हती. पण अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर फलंदाज मोहम्मद शहजाद दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर गेल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून इक्रमला अफगाणिस्तान संघात संधी मिळाली होती.

इक्रमने केलेले हे खास विक्रम –

#विश्वचषकात सर्वात कमी वयात पहिले अर्धशतक करणारे खेळाडू –

17 वर्षे 362 दिवस – तमिम इक्बाल (2007, विरुद्ध भारत)

18 वर्षे 234 दिवस – मोहम्मद अश्रफुल (2003, विरुद्ध न्यूझीलंड)

18 वर्षे 278 दिवस – इक्रम अली खील (2019, विरुद्ध वेस्ट इंडीज)

18 वर्षे 315 दिवस – सचिन तेंडुलकर (1992, विरुद्ध पाकिस्तान)

18 वर्षे 318 दिवस – सचिन तेंडुलकर (1992, विरुद्ध झिम्बाब्वे)

#विश्वचषकात सर्वात कमी वयात 80 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू –

18 वर्षे 278 दिवस – इक्रम अली खील – 86 धावा (2019, विरुद्ध वेस्ट इंडीज)

18 वर्षे 318 दिवस – सचिन तेंडुलकर – 81 धावा (1992, विरुद्ध झिम्बाब्वे)

#वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी विश्वचषकात सर्वोच्च धावांची खेळी करणारे खेळाडू –

86 धावा  – इक्रम अली खील (18 वर्षे 278 दिवस – 2019, विरुद्ध वेस्ट इंडीज)

84 धावा – सचिन तेंडुलकर (18 वर्षे 323 दिवस -1992, विरुद्ध न्यूझीलंड)

81 धावा – सचिन तेंडुलकर (18 वर्षे 318 दिवस -1992, विरुद्ध झिम्बाब्वे)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सेमीफायनल आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

विराट कोहलीने पाळला शब्द; क्रिकेट चाहत्या ८७ वर्षीय आजींसाठी केली ही खास गोष्ट

बांगलादेश विरुद्ध एमएस धोनीने केलेल्या खेळीबद्दल सचिन तेंडुलकर म्हणाला…