कमबॅक किंग ‘शाहिद आफ्रिदी’ पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय सामन्यात!

दुबई | पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. तो विश्व एकादश (वर्ल्ड ११) संघाकडून हा सामना खेळणार आहे. 

विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट इंडिजमधील एका मैदानाचे नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी शाहिद आफ्रिदीबरोबर शोएब मलिक आणि थिसारा परेरा विश्व एकादश (वर्ल्ड ११) संघाकडून या सामन्यात खेळणार आहेत. 

शाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक हे २००९मध्ये टी२० विश्वचषक विजेत्या पाकिस्तान संघाचे भाग होते. त्या विश्वचषकाचा अंतिम सामना लाॅर्ड्स मैदानावर झाला होता तर परेरा हा २०१४मध्ये ढाक्यात झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा सदस्य होता. 

शाहिद आफ्रिदीचे ५वे कमबॅक-

शाहिद आफ्रिदीचे हे ५वे कमबॅक मानले मानले जात आहे. त्याने आंतरराष्ट्रीय सामना २५ मार्च २०१६ रोजी खेळला असून १९ फेब्रूवारी २०१७मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

तर तो पीएसएलमध्ये १८ मार्च २०१८ रोजी कराची किंग्जकडून शेवटचा सामना खेळला होता. त्याने आपण ही शेवटची स्पर्धा खेळत असल्याचे तेव्हा म्हटले होते.  परंतू आता तो पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार आहे.  

महत्वाच्या बातम्या: